daraara 24 Taas "news website"Hindi Marathi news "darara 24tas"darara 24 Taas "political"gavakadchya batmya "

२४.६.२३

अभियंत्याच्या घरी सापडले ड्रग्स, तालुक्यात खळबळ, अभियंत्यास अटक करून दिल्लीत नेले



पोंभुर्णा : तालुक्यात अमली पदार्थ आयात केले जातात याचा उलगडा झाला आहे.अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभाग, दिल्लीच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभाग, पोंभूर्णा येथे कार्यरत अभियंता हेमंत बिचवे (29) यांच्या घरी छापा टाकून ‘MD व LSD ड्रग्ज’ जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

दिल्ली येथील एका अंमलीपदार्थ प्रकरणाचा शोध घेताना हे पथक चंद्रपूरपर्यंत पोहचल्याने या प्रकरणात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. याप्रकरणी अभियंता बिछवे यांना अटक करून दिल्ली येथे नेण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, हे अंमली पदार्थ भारतीय टपाल खात्याच्या माध्यमातून पोंभूर्णा येथे पोहोचवण्यात आले होते. या छाप्यात बिछवे यांच्या घरी 3 ग्रॅम एमडी ड्रग्ज मिळाले तर एलएसडी ड्रग्जचे 24 पोस्ट कार्डची तिकीटे मिळाली. यातील एक पोस्टकार्ड तिकीट हे तीन हजार रुपयांचे आहे. या ड्रग्ज प्रकरणाची सर्व सूत्रे दिल्ली येथे जुळलेली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली. अभियंता बिछवे नागपुरातील रहिवासी आहेत.
या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ड्रग्स माफिया सक्रिय असल्याची चर्चा होत आहे.

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ