गोंडपिपरी तालुक्यातील रेती अन् पोंभुर्णा तालुक्याला ताप! जिकडे तिकडे रेतीची वारे माप चोरी? महसूल प्रशासन निद्रिस्त! चेक निखितवाडा रेती घाटातील रेती वाहतूक भिमणी नदीपात्रातून? अंधारी नदिच्या नैसर्गिक धारेला अडवून बिगडवला जात आहे पर्यावरणाचा समतोल

गोंडपिपरी तालुक्यातील रेती अन् पोंभुर्णा तालुक्याला ताप! जिकडे तिकडे रेतीची वारे माप चोरी? महसूल प्रशासन निद्रिस्त! चेक निखितवाडा रेती घाटातील रेती वाहतूक भिमणी नदीपात्रातून? अंधारी नदिच्या नैसर्गिक धारेला अडवून बिगडवला जात आहे पर्यावरणाचा समतोल जिवनदास गेडाम (वि.प्र.) चंद्रपूर:गोंडपिपरी तालुक्यातील रेती घाटाची रेती अंबरनाथ तालुक्यातून धुमधडाक्यात सुरू असल्यामुळे रस्त्यांची चाळण होत आहे. तसेच अनेक गावातून ही वाहतूक होत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. धूळ व ध्वनी प्रदूषणाने नागरिकांचे बेहाल होत असताना व करोडोचा महसूल बुडवला जात असताना महसूल विभाग कारवाई का करत नाही हा एक प्रश्नच निर्माण झाला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील चेक लिखितवाडा रेतीघाट शासकीय बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ ला मंजूर करण्यात आला आहे. या रेतीची उचल व वाहतूक करण्याची जबाबदारी हैद्राबाद येथील एका बांधकाम कंपनीला देण्यात आली. मात्र सदर रेतीघाटात शासकीय नियम धाब्यावर बसवून अवैध रेती उपसा व वाहतूक करण्यात येत आहे. रेती वाहतूक करणारे एवढ्यावरच न थांबता नदीतून मुरूम टाकून चेक लिखितवाड...