Ticker

6/recent/ticker-posts

जूनगावात भाजपला विक्रमी मतदान! 891 पैकी 696 मते घेऊन भाजप नंबर वन वर

जूनगावात भाजपला विक्रमी मतदान! 891 पैकी 696 मते घेऊन भाजप नंबर वन वर



दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 

पोंभुर्णा:बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपा महायुतीचे उमेदवार, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २६ हजार पेक्षा जास्त मतांची आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला असून ते सातव्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत. सातव्यांदा विधानसभेत निवडून जाणारे ते विदर्भातील एकमेव उमेदवार आहे. त्यांच्या विजयासाठी ग्रामीण भाग असलेल्या जुनगाव येथे त्यांना विक्रमी मतदान झाले. येथील प्रभारी सरपंच राहुल भाऊ पाल यांच्या नेतृत्वात हा विक्रम घडून आला. 1008 एकूण मतदानापैकी 891 मतदान झाले. त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना 696 मते मिळाली. काँग्रेसचे संतोष सिंहारावत यांना 142 तर इतरांना बावन मते मिळाली.

जूनगाव हे गाव सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या साठी अनुकूलच असून भाऊंच्या हस्ते या गावात अनेक विकास कामे झाली असून दोन्ही नदीवर मोठ्या पुलाच्या निर्मितीस त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर येथील सरपंच राहुल भाऊ पाल व त्यांच्या सहकाऱ्यांचे सुद्धा अथक परिश्रम आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयाचा उंच आलेख

१९९५ मध्ये तत्कालीन चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातुन ५५ हजाराच्या वर मताधिक्य घेत विदर्भातून सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा बहुमान त्यांनी पटकाविला. त्यानंतर १९९९, २००४ पर्यंत सलग ते चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून निवडून गेले व विजयाची हॅट्रिक त्यांनी केली.

त्यानंतर मतदार संघ पुनर्रचनेनंतर त्यांनी शेजारच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातुन निवडणूक लढली. या विधानसभा क्षेत्रातुन देखील त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली. २००९, २०१४, २०१९ मध्ये मताधिक्याने निवडणूका त्यांनी जिंकल्या. २०१४ मध्ये राज्याच्या अर्थ व वनमंत्री पदाची धुरा त्यांनी सांभाळली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर वने, सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय या खात्यांचे ते मंत्री ते झाले.

गावात निघाली भव्य विजय मिरवणूक 

त्यांच्या प्रेमापोटीच रिझल्टची माहिती झाल्याबरोबर जूनगावात डीजेच्या तालावर नाचत, वाजत- गाजत भव्य अशी रॅली, विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला, पुरुष, बालगोपालांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सुधीर भाऊ आगे बढो! हम तुम्हारे साथ है अशा गगनभेदी नाऱ्यांनी गाव दुमदुमून गेले होते.

Post a Comment

0 Comments