पोस्ट्स

बल्लारपूर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बल्लारपुरात प्रा. शाम मानव यांचे जाहीर व्याख्यान

इमेज
बल्लारपुरात प्रा. शाम मानव यांचे जाहीर व्याख्यान दरारा 24 तास न्यूज नेटवर्क  चंद्रपूर: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले आहेत. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांनी वेगवेगळे माध्यम उपयोगात आणून समाजात पोहोचत आहेत. बल्लारपूर विधानसभा राज्यातच चर्चेची ठरत आहे. याला कारण म्हणजे राज्याचे वजनदार मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना टपून बसली आहे. या विधानसभेत काँग्रेसचा आणि सेनेचा मोठा धबधबा निर्माण झालेला आहे.  काँग्रेस नेते डॉक्टर संजय घाटे हे या विधानसभेत निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभा क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबवून समाज बांधणीचा विडा उचललेला आहे.  दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी बल्लारपूर येथे संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ या अभियानाखाली प्रख्यात विचारवंत प्राध्यापक श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर संजय घाटे हे असून राजे बल्लाळ शाह सभागृह येथे होणार आहे. या जाहीर व्याख्यानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन...

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात कोठारी मानोरा जिल्हा परिषद क्षेत्रात बैठक संपन्न

इमेज
दरारा 24 तास  बल्ज्येलारपूर : कांग्रेस नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष *संतोष सिंह रावत* यांच्या नेतृत्वात *कोठारी- मनोरा जिल्हा परिषद* क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत व कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली.  सदर बैठकीला युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन निलमवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मोगरकर, युवा कार्यकर्ते भास्कर कावळे, बादल भाऊ उराडे, किन्हीचे सरपंच जीवनकलाताई अलार्म, रमेशजी जम्पलवार, नरेश बुरांडे, तुळशीदास पिपरे, सूर्यकांत दयालवार, सुनील कोहरे, धीरज गवारे, नंदकिशोर भोयर, ऋषीदेव वासाडे, कालिदास उईके, पांडुरंग गवारे, लोकेश आंबेडोरे, धाडूजी दूधबळे, सुरेश भाऊ वासाडे, अभिषेक टिकले, विजय पिपरे, हनुयाम बुरांडे, ऋषी पिपरे, अंकुश दुधबळे, विजय पिपरे, मनोहर टिकले, सुनीलजी कोहळे, वैशालीताई गवारे, सुमनबाई बारसागडे, गुरुदेव बुरांडे तथा काँग्रेस व महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बल्लारपूर तालुक्यातील मानोरा, इटोली येथे काँग्रेसची बैठक संपन्न 👍 संतोष सिंह रावत यांनी केले गावकऱ्यांना मार्गदर्शन

इमेज
बल्लारपूर तालुक्यातील मानोरा, इटोली येथे काँग्रेसची बैठक संपन्न संतोष सिंह रावत यांनी केले गावकऱ्यांना मार्गदर्शन दरारा 24 तास   बल्लारपूर: काँग्रेस नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषभाऊ रावत यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात तालुक्यातील मानोरा, इटोली येथे बैठक घेण्यात आली.या बैठकीत युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन निलमवार , युवक काँग्रेसचे सुजित खोब्रागडे, गणेश निलमवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. गावातील महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, काँग्रेसचे मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीत संतोष भाऊ रावत यांनाच विधानसभेची उमेदवारी मिळावी, आम्ही मोठ्या ताकतीने काम करू असा संकल्प केला.  या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (पवार गट)जिल्हा उपाध्यक्ष भास्कर कावळे, दत्तात्रय घीवे, रमेशजी जम्पलवार तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, गुरुदेवजी बुरांडे, विलास गवारे‌ तालुका सचिव काँग्रेस, सुनील कोहरे ग्रा.पं.सदस्य मानोरा ,...

बल्लारपूर विधानसभेसाठी अहिरकर सज्ज! वाढदिवसानिमित्त छत्री वाटप कार्यक्रमाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या...काँग्रेस प्रबळ दावेदार!चाहूल विधानसभा निवडणुकीची ..

इमेज
बल्लारपूर विधानसभेसाठी अहिरकर सज्ज!   वाढदिवसानिमित्त छत्री वाटप कार्यक्रमाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या... काँग्रेस प्रबळ दावेदार!चाहूल विधानसभा निवडणुकीची .. बल्लारपूर:- विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली, तस तशी राजकीय पक्षांनी मोर्चे बांधनीला सुरुवात केली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे सुधीर मुनगंटीवार यांचे कडे आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जिद्द संचारलेली दिसत आहे. नामदार सुधीर मुनगंटीवार यांना पराभूत करणे सोपी गोष्ट नाही. तरीसुद्धा या निवडणुकीत नक्कीच फेरबदल होणार आणि काँग्रेस ही निवडणूक जिंकेल, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पहावयास मिळत आहे. या विधानसभेसाठी काँग्रेस कडून अनेक दावेदार आहेत. अनेक काँग्रेसचे दिग्गज उमेदवारी मलाच मिळेल, यासाठी प्रयत्नरत आहेत. यामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे उपाध्यक्ष व चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, विनोद अहिरकर हे सुद्धा या विधानसभेसाठी तयारीला लागले आहेत. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नुकताच 3000 छत्री वाटपाचा कार्यक्रम ...

अबकी बार बल्लारपुर में कांग्रेस का आमदार। आभार सभेत कार्यकर्त्यांचा निर्धार

इमेज
कार्यकर्ताओं का आभार। अब की बार नया आमदार।काँग्रेसीयों का निर्धार चंद्रपुर। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 60000 पेक्षा जास्त अशा प्रचंड मताधिक्याने काँग्रेस उमेदवार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर या विजयी झाल्या. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसला भरभरून जनतेचे प्रेम मिळाले. त्यामुळे बल्लारपूर आणि बल्लारपूर ग्रामीण कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी एकदंत लान बल्लारपूर येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजता आभार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत 400 ते 500 कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर चे माजी नगराध्यक्ष काँग्रेस नेते घनश्याम मूलचंदानी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अहिरकर, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शंतनु धोटे, बल्लारपूर ग्रामीण अध्यक्ष गोविंदा उपरे, शहर अध्यक्ष करीम भाई, भास्करजी माकोडे, राजू झोडे, प्राध्यापक दिलीप चौधरी, वागदरकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेऊन काँग्रेसला प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून दिला. हिच शक्ती आणि ताकद बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीत दाखवा...

काँग्रेसच्या आभार सभेत विधानसभा जिंकण्याचा निर्धार ⭐ घनश्याम मूलचंदानी , विनोद अहिरकरांची रणनीती! बैठकीला तीनशे पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती

इमेज
काँग्रेसच्या आभार सभेत विधानसभा जिंकण्याचा निर्धार घनश्याम मुलचंदानी,विनोद अहिरकरांची रणनीती! बैठकीला तीनशे पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती चंद्रपूर: बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पळसगाव वांढरवाडी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीला पळसगाव, मानोरा, इटोली, कोठारी, आंमडी, कोर्टी मक्ता, गिलबिली, कळमगाव आदी गावातील जवळपास 300 हून जास्त कार्यकर्ते उपस्थित होते. सदर बैठकीचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम मूलचंदानी, ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर, गोविंदा उपरे यांनी केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या व इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना या क्षेत्रातून प्रचंड मताधिक्याने मतदान करून विजय संपादन करून दिल्याबद्दल पळसगाव- कोठारी जि ल्हा परिषद क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने काम करून पक्षाला विजय संपादन करून दिला त्याच पद्धतीने पुढील येणारी विधानसभा...

चंद्रपूर जिल्ह्यात घोंगावतेय संदीप गिर्हे नावाचं वादळ! बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची मुसंडी, भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

इमेज
बल्लारपूर प्रतिनिधी: चंद्रपूर जिल्ह्यात व विशेष करून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांचे नेतृत्व क्षेत्रातील जनसामान्य माणसांना भावले असून त्यांच्या नेतृत्वात अनेक भाजपच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. काल दिनांक 19 जुलै रोजी बल्लारपूर तालुक्यातील कवडजई या गावच्या माजी उपसरपंच सौ. कल्पना कुकुडकर यांनी त्यांच्या अनेक समर्थक, कार्यकर्त्यांसह संदीप भाऊ गिर्हे यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.  यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिक्की भैय्या यादव, तालुकाप्रमुख प्रकाश पाठक, शहर प्रमुख बाबा साहू, युवासेना नेता प्रशांत गडला, मुकद्दर भाई, महादेव लोणारे प्रामुख्याने उपस्थित होते. माजी उपसरपंच  कल्पना कुकुडकर, संदीप कुकुडकर, वेदांत कुकुडकर, श्रीराम उपरे, गणेश रुपेश जुवारे, गणेश नैताम, प्रकाश बद्दलवार, राकेश, बंडूभाऊ,इत्यादींनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपला चारी मुंड्या चित करून इंडिया आघाडी...

*विसापूर मध्ये श्री संताजी जगनाडे महाराज 399 वी जयंती महोत्सव* - तेली समाजाने हक्कासाठी सामूहिक लढा द्यावा

इमेज
* विसापूर मध्ये श्री संताजी जगनाडे महाराज 399 वी जयंती महोत्सव*- - तेली समाजाने हक्कासाठी सामूहिक लढा द्यावा-मान्यवरांचा सूर। दरारा 24 तास न्युज,           बल्लारपूर: महाराष्ट्राचे थोर संत, तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा 399 वी जयंतीचा महोत्सव विसापूरमध्ये तेली समाज बांधवांच्या वतीने उत्साहाने साजरा करण्यात आला.           कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम श्रीमती शकुंतला इटनकर व श्रीमती बहिणाबाई गिरडकर यांच्या हस्ते घटस्थापना करून ढोल पथक रॅली काढून गावातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन गुरुदास गिरडकर, प्रमुख पाहुणे शालिनी आंबटकर मॅडम प्रभारी प्राचार्य, राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर व अमृताताई बावनकुळे, शेवंताताई बावणे, मिताताई गिरडकर याच्या शुभहस्ते करून जगनाडे महाराज यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन करण्यात आले.            याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमात संतांचे योगदान विषयावर भाषण स्पर्धा, शिक्षणाचे महत्व विषयावर निबंध स्पर्धा व 5 ते 13 वर्ष वयोगटात नृत्य स्पर्धा घेण्यात आली. सांस्...