पोस्ट्स

चामोर्शी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आष्टीत दिव्यांग वृद्धाची शस्त्राने निघृण हत्या। अज्ञात आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू।

इमेज
आष्टीत दिव्यांग वृद्धाची शस्त्राने निघृण हत्या। अज्ञात आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू। गडचिरोली। (विकास रामटेके,विशेष प्रतिनिधि) किरायाच्या घरात राहत असलेल्या दिव्यांग वृद्धाची अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. ही धक्कादायक घटना १५ डिसेंबरला उघडकीस आल्यानंतर आष्टीसह संपूर्ण परिसर हादरला आहे, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. रशीद अहमद शेख (६०, रा. बुटीबोरी, नागपूर) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रशीद शेख हे पायाने दिव्यांग होते. ते २० वर्षांपासून आष्टी येथे किरायाची खोल्वे घेऊन वास्तव्यास होते. त्यांनी १२ डिसेंबर रोजी नातेवाइकांना दूरध्वनीद्वारे गावाकडे येत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर चारपाच दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर त्यांचा फोन लागत नसल्याने नातेवाइकांना शंका येऊ लागली. त्यामुळे शेख यांचे नातेवाइक नागपूरवरून आष्टी येथे आले. त्यांचा फोटो दाखवून हा व्यक्ती कुठे राहतो, अशी विचारणा करू लागले. तेव्हा आष्टी येथील चौकातील काहींनी चामोर्शी मार्गावरील खुशाल कुकडकर यांच्या घरी किरायाने राहत असल्याची माहिती नातेवाइकांना दिली. त्यानंतर नातेवाइकांनी कुकडकर यांचे ...

सातवीतील विद्यार्थिनी वर काळाची झडप! प्रांजली शेंडे हिचा आकस्मिक मृत्यू

इमेज
सातवीतील विद्यार्थिनी वर काळाची झडप! प्रांजली शेंडे हिचा आकस्मिक मृत्यू दरारा 24 तास न्युज नेटवर्क  चामोर्शी: तालुक्यातील भिक्शी माल येथील प्रांजली कैलास शेंडे राहणार भिक्षी माल या सातवीतील विद्यार्थिनीचा आकस्मिक मृत्यू झाल्याने गावात व शाळेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रांजली कैलास शेंडे ही विद्यार्थिनी खूप साधा सरळ स्वभावाची विद्यार्थिनी होती. मात्र अचानक तिच्यावर काळाने झडप घातली आणि कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले. विद्यार्थिनीच्या मृत्यूने गावात व परिसरात शोक पसरला आहे.

कान्होलीत आढळला हातपपाच्या पाण्यात नारू

इमेज
कान्होलीत आढळला हातपपाच्या पाण्यात नारू दरारा 24 तास न्युज नेटवर्क चामोर्शी: तालुक्यातील कान्होली गावातील अंगणवाडी केंद्राजवळ असलेल्या हातपंपाच्या पाण्यात महिला पाणी भरत असताना नारू आढळल्याने एकच खळबळ उडाली. येथील नागरिक सुरेश भाकरे यांनी त्या नारुला बाटलीत बंद करून माध्यम प्रतिनिधीला माहिती दिली. गावातील सार्वजनिक पानवठ्याची निगा राखणे ही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने हातपंप व विहिरी यात ब्लिचिंग पावडर टाकून पाणी निर्जंतुकीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कळमगाव-बोरघाट पांदण रस्त्याची दुरवस्था

इमेज
कळमगाव-बोरघाट पांदण रस्त्याची दुरवस्था चामोर्शी : तालुक्यातील कळमगाव-बोरघाट पांदण रस्ता शेतकरयांना शेताकडे जाण्यासाठी सोयीचा असून सध्या याच रस्त्यावरून रेतीचे ट्रॅक्टर वाहतूक सुरू असून रस्त्याचे तीनतेरा वाजले आहे .संबंधित विभागानी लक्ष द्यावे, अशी मागणी कळमगाव येथील शेतकरी मयूर लाड यांनी केली आहे. शेतकऱ्यांना शेतातील उत्पादित माल व शेतीकडे जाणे सोयीचे व्हावे म्हणून पांदण रस्त्याची सोय करण्यात आली. मात्र या रस्त्याचा वापर रेती भरलेले ट्रॅक्टर करीत असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.  या मार्गावर कळमगाव येथील शेती आहे. पावसाळ्यात शेताकडे जाणारा प्रमुख रस्ता असल्याने रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून पावसाळ्यात शेतीकडे कसे जायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे संबंधित विभागानी लक्ष देऊन अवैध रेती वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी मयूर लाड यांनी केली आहे.

लिव्हर निकामी झालेल्या तरुणाची आर्थिक मदतीची हाक! *नवा जन्म घेण्यासाठी लखमापुर बोरी येथील तरुणाची केविलवाणी धडपड* *दानदात्यांनी मदत करण्याचे आवाहन*

इमेज
लिव्हर निकामी झालेल्या तरुणाची आर्थिक मदतीची हाक! *नवा जन्म घेण्यासाठी लखमापुर बोरी येथील तरुणाची केविलवाणी धडपड* *दानदात्यांनी मदत करण्याचे आवाहन* अजित गेडाम, जुनगाव: प्रतिनिधी  येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथील सचिन घनश्याम वैरागडे या 28 वर्षीय तरुणास लिव्हर आफ हिरोसिस या रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे त्याचा लिव्हर कायमचा निकामी झालेला आहे. त्याच्या लिव्हर ट्रान्सफर साठी 25 ते 30 लाखाचा खर्च असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सोनल ट्रान्स प्लांट कॉर्डिनेशन सेंटर नागपूर, या संस्थेमार्फत त्याला नवीन जीवनदान देण्यात येणार आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे इतकी मोठी रक्कम जुडवणे शक्य नाही. आतापर्यंत अशा परिस्थितीतही त्याच्या वडिलांनी 18 ते 20 लाख रुपये खर्च केले आहे. 2020 पासून या आजाराने हा युवक ग्रस्त आहे. त्याला नवीन जीवन दान देण्यासाठी दानकर्त्यांनी,नातेवाईकांनी, मित्रांनी शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करून मला जीवन दान द्यावा अशी केविलवाणी विनंती त्यांनी केली आहे. गुगल पे खालील प्रमाणे-830145784

दोन दुचाकीच्या धडकेत चिमुकली सह दोघांचा मृत्यू, चामोर्शी तालुक्यातील घटना

इमेज
दोन दुचाकीच्या धडकेत चिमुकली सह दोघांचा मृत्यू, चामोर्शी तालुक्यातील घटना चामोर्शी प्रतिनिधी: चामोर्शी आष्टी रोडवर एका विचित्र अपघातात चिमुकलीसह दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. रामेश्वर गंगाधर कुंभमवार वय 38 वर्ष राहणार अनखोडा, व रियांशा धनराज वाढली वय आठ वर्षे राहणार जामगिरी असे अपघातात मृत्यू पावलेल्यां ची नावे आहेत. इतर तीन जण जखमी असून त्यांचे वर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. ट्रक चालकास ताब्यात घेऊन आष्टी पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

सुरजागड लोह प्रकल्पाच्या वाहतुकीचा पहिला बळी, लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक खाली येऊन बारा वर्षीय मुलीचा मृत्यू

इमेज
चामोर्शी: गडचिरोली जिल्ह्यात नव्यानेच सुरू असलेल्या सुरजागड प्रकल्पाच्या लोहखनिज वाहतुकीची नागरिकांना झळ बसत आहे. या वाहतुकी विरुद्ध अनेक संघटनांनी आवाज उठवला मात्र तो आवाज कुठेतरी दाबला गेला. आज दिनांक 14 मे 2023 रोजी चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहरात बारा वर्षीय मुलीला चिरडल्याची दुर्दैवी घटना तीन वाजता चे सुमारास घडली. सोनाक्षी मसराम वय बारा वर्षे असे या दुर्घटनेत मृत पावलेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. गावाचे नाव कळू शकले नाही. या घटनेमुळे काही काळ घटनास्थळावर तणाव पसरला होता.      आपल्या मामासोबत सोनाक्षी आष्टी वरून गुलबिपरीकडे जात होती दरम्या आष्टी येथील वनविभागाच्या नाक्यासमोर दुचाकी घसरली. आणि दोघेही खाली पडले. दरम्यान लोहखनिज घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली मुलगी आल्याने ति चीरडल्या गेली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.      घटनेनंतर ट्रक चालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून प्रसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. घटनास्थळावर पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले आपल्या सहकानिशी दाखल झाले. पुढील कारवाई सुरू आहे.

दुःखद घटना: डॉक्टर चंद्रकांत सरकार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

इमेज
चामोर्शी तालुका प्रतिनिधी    डॉक्टर चंद्रकांत सरकार यांचा गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारात दरम्यान मृत्यू झाला.       मूडचे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका कन्हाळगाव येथील रहिवाशी असून ते आठ ते दहा वर्ष चंद्रपूर जिल्ह्यातील जुनगाव येथे वैद्यकीय व्यवसाय करीत होते. त्यानंतर त्यांनी स्वतःचे गाव कन्नड गाव येथे राहून आजूबाजूच्या खेड्यात वैद्यकीय सेवा देत होते.     त्यांना स्वच्छ श्वास घेण्यात अडचण येत असल्यामुळे 17 मार्च 2023 रोजी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र आज त्यांचा उपचारादरम्यान दुपारी तीनच्या सुमारास मृत्यू झाला.       त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, ज्योतिष आणि नितीश, एक मुलगी मोनिका, नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.       त्यांचा मृतदेह गडचिरोली वरून त्यांचे राहते गाव कन्नड गाव येथे आणण्यात येत असून उद्या दिनांक 19 मार्च रोजी त्यांचे व अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.