कळमगाव-बोरघाट पांदण रस्त्याची दुरवस्था
चामोर्शी : तालुक्यातील कळमगाव-बोरघाट पांदण रस्ता शेतकरयांना शेताकडे जाण्यासाठी सोयीचा असून सध्या याच रस्त्यावरून रेतीचे ट्रॅक्टर वाहतूक सुरू असून रस्त्याचे तीनतेरा वाजले आहे .संबंधित विभागानी लक्ष द्यावे, अशी मागणी कळमगाव येथील शेतकरी मयूर लाड यांनी केली आहे. शेतकऱ्यांना शेतातील उत्पादित माल व शेतीकडे जाणे सोयीचे व्हावे म्हणून पांदण रस्त्याची सोय करण्यात आली. मात्र या रस्त्याचा वापर रेती भरलेले ट्रॅक्टर करीत असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
या मार्गावर कळमगाव येथील शेती आहे. पावसाळ्यात शेताकडे जाणारा प्रमुख रस्ता असल्याने रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून पावसाळ्यात शेतीकडे कसे जायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे संबंधित विभागानी लक्ष देऊन अवैध रेती वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी मयूर लाड यांनी केली आहे.
0 Comments