पोस्ट्स

नांदेड लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मनुष्याच्या दैनंदिन जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगा आवश्यक - गुणवंत मिसलवाड

इमेज
मनुष्याच्या दैनंदिन जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगा आवश्यक - गुणवंत मिसलवाड नांदेड- आजच्या या धकाधकीच्या जीवनाच्या आधुनिक काळात मनुष्य पैशाच्या मागे धावत असून स्वतःच्या शरीराकडे माणूस दुर्लक्ष करीत आहे, म्हणून स्वतःच्या व इतरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलीत ठेवण्यासाठी योगा हा आवश्यक आहे. असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपा) नांदेड आगार येथे दि. २१ जून २०२४ शुक्रवार रोजी १० वा जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना पुढे ते आपल्या भाषणात म्हणाले की, योग दिनाचे ध्येय व उद्दिष्टे बघितले तर सर्व जनतेचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे आणि जीवन योगमय करणे हेच या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्दिष्ट असून समाजातील सर्व स्थरापर्यंत योगाचा प्रचार आणि प्रसार करणे आणि त्याचे फायदे जाणून घेणे ही काळाची गरज बनली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी बसस्थानक प्रमुख मा.श्री...

आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करू - व्यंकट मुदीराज

इमेज
आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करू - व्यंकट मुदीराज (विशेष प्रतिनिधी) दरारा 24 तास नांदेड:- मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असे प्रतिपादन अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज संघटना नवी दिल्ली या संघटनेचे मराठवाडा प्रमुख मा.श्री. व्यंकट मुदीराज यांनी केले. ते दि. १६ जून २०२४ रविवार रोजी सकाळी ठिक १२.०० वाजता आदिवासी कोळी समाजाची नांदेड जिल्हास्तरीय बैठक गौरक्षण सभागृह, हनुमान मंदिर प्रांगण गोकुळनगर नांदेड येथे पार पाडली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष पदावरुन बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, गेल्या दहा बारा वर्षापासून कोळी महादेव व तत्सम अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद येथे संचिका हेतुपुरस्सर अडवून ठेवत आहेत. आठ हजार संचिका कोळी महादेव व तत्सम जमातीचे प्रलंबित असल्यामुळे दप्तर दिरंगाई कायदा २०२६ कलम मधील तरतुदीनुसार शासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात तिव्र स्वरुपात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावे...

एसटी च्या कामगार- कर्मचाऱ्यांनी घेतली मेरी माटी मेरा देश पंचप्रण ची शपथ

इमेज
एसटी च्या कामगार- कर्मचाऱ्यांनी घेतली मेरी माटी मेरा देश पंचप्रण ची शपथ नांदेड- भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमाद्वारे शासनाच्या निर्देशान्वये मोठ्या दिमाखात विविध स्तरावर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. ९ ऑगस्ट २०२३ बुधवार रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता रा.प. नांदेड आगारातील कामगार- कर्मचाऱ्यांनी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश (माझी माती माझा देश, मातीला नमन, विरांना वंदन) पंचप्रण ची शपथ सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मा. श्री. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ही पंचप्रण शपथ एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी सामूहिकरित्या कामगार कर्मचाऱ्यांना दिली. यावेळी आगाराचे वाहतूक निरीक्षक मा.श्री. - राजेश धनजकर, मोबीन मैनोद्दीन शेख, पाळी प्रमुख मनोहर माळगे, संभा जोगदंड, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुर...

लोकमान्य टिळक हे भारत स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते - गुणवंत मिसलवाड

इमेज
लोकमान्य टिळक हे भारत स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते - गुणवंत मिसलवाड नांदेड- भारत देश स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीर, क्रांतीकारक, समाजसुधारक, स्वातंत्र्य सेनानींनी आपापल्या परीने शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करुन देशासाठी मोठे योगदान दिले आहेत. त्यापैकीच एक भारत देश स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते म्हणजे लोकमान्य केशव बाळ गंगाधर टिळक होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. २३ जुलै २०२३ रविवार रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता थोर समाजसुधारक, जहाल मतवादी, पत्रकार, महान अभ्यासक, तत्त्वज्ञ लोकमान्य केशव बाळ गंगाधर टिळक यांच्या १६७ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, लोकमान्य केशव बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच हे ध्येय उराशी बाळगून केसरी, द मराठा (इंग्रजी) वर्तमानपत्राच्या माध्यमा...

भुरट्या न्यूजपेपरच्या भामट्या पत्रकारांनो... मृतक अक्षय भालेरावच्या भावाचा खालील जवाब वाचा एकदा...

इमेज
"मी समक्ष पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे हजर राहून विचारल्या वरून जबाब देतो की, मी परिवारासह वरील ठिकाणी राहत आहे.मी माझा मयत झालेला भाऊ अक्षय तसेच अन्य भाऊ गौतम आणि अजय , आई वंदना व वडील श्रावण यांचेसह राहतो. सर्व जण मोल मजुरी करून जगतात. आज आमचे गावातील मराठा समाजातील नारायण विश्वनाथ तिडके याचे लग्न बामणी येथे झाल्यावर त्याने बोंढार हवेली गावात वऱ्हाडासह येऊन सायंकाळी वरात काढली होती. त्यात त्याने डी. जे. लावून डान्स करत करत मुख्य रस्त्याने हातात तलवार, खंजर, लाठ्या-काठ्या घेऊन ओरडत ओरडत चाललेले होते. त्या दरम्यान विठ्ठल तिडके याचे घरासमोरील कामाजी तिडके यांच्या दुकानावर मी व माझा भाऊ अक्षय श्रावण भालेराव आम्ही किराणा सामान आणण्यासाठी गेलो होतो. तेथे लाईटचा लख्ख उजेड होता. सायंकाळी अंदाजे साडे सात वाजण्याची वेळ असावी. आम्हास तेथे बघून संतोष संजय तिडके हा मोठ मोठयाने ओरडून आम्हाला जातीवरुन शिव्या देवून, यांना तर जीव मारलं पाहिजे.. गावात भीम जयंती काढता का? असे मोठ्याने म्हणत होता. त्यानंतर कृष्णा गोविंद तिडके, निळकंठ रमेश तिडके, नारायण विश्वनाथ तिडके, शिवाजी दिगंबर ...

*चुलीत गेले तुमचे शिक्षण.. *डॉ.अरुण गोधमगावकर यांचे वृद्धाश्रमातच निधन*

इमेज
Dr.Arun Sir *डाॅ. अरुण गोधमगांवकर सर, हे एक नामांकित बालरोग तज्ञ डॉक्टर होते.त्यांनी आयुष्यभर अनेक बालकांना जीवनदान दिले.* *ते मागील अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुक्मिणी* *वृद्धाश्रमात राहत होते, ते नांदेड जिल्ह्यातील मूळचे नायगाव तालुक्यातील गोधमगाव चे होते, परंतु ते नंतर बिलोलीला स्थायिक झाले होते* *ते स्वतःच्या मुलाला एम. डी. डॉक्टर व मूलीलाही स्री रोग तज्ञ डॉक्टर करून, काही वर्षापू्र्विच त्या दोघांनाही अमेरीकेला पाठवले होते, सून व जावई ते पण डॉक्टरच आहेत, सगळेच आपापल्या जीवनात व्यस्त असल्याने, आई वडीलाकडे लक्ष द्यायला कोणिच रिकामे नव्हते.* *उतारवयात डॉक्टर साहेबांच्या पत्निचे निधन झाले, त्यावेळेस देखील अमेरिका मधून त्यांचा ना मूलगा आला, ना ही मूलगी आली, मग गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.* *त्यानंतर डॉक्टर साहेब लातूर जिल्ह्यातील अहमदपूर य़ेथे रुक्मिणी वृद्धाश्रम मध्ये रहायला गेले, चार वर्षाचा काळ तेथे व्यतीत केला, आणि नुकतेच डॉ.अरुण गोधमगावकर सर यांचे दुःखद निधन झाले,* *वृद्धाश्रम चालकाने त्यांच्या अमेरीकास्थीत मुलगा, मुलगी आणि जावई यांना निरोप कळवला, परंतु  ...

महापुरुषांच्या पुतळ्या समोरील तांडा, ज्योती,नटराज बिअर बार हटवून मालकावर ॲट्रॉसिटी दाखल करा . 👉 भीम टायगर सेनेचे सरसेनापती दादासाहेब शेळके यांची मागणी

इमेज
चक्रधर मेश्राम, एखाद्या व्यवसाय उभा करत असताना आर्टिकल 19 (6) नुसार तो मूलभूत हक्क जरी असला तरी हा व्यवसाय उभा करत असताना आरोग्य,कायदा,नैतिकता, सामाजिक एकता धोक्यात येता कामा नये हे संविधानाने सांगितले आहे.असे असताना नांदेड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज, लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या पुतळा व शहरातील इतर दारू व बारला परवानगी देऊन शासनाने कायद्याचे तीन तेरा वाजविले असून त्यांच्या या चुकीच्या वागण्यामुळे भविष्यात त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण होऊ शकतो.भविष्यात काही जीवित हाणी झाल्यास त्यास शासन जबाबदार असेल.पुढे आपल्या घणाघाती भाषणात दादासाहेब शेळके म्हणाले की, भारतीय संविधान भाग 4 राज्याची मार्गदर्शक तत्वे अनुच्छेद 47 नुसार जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे हे राज्य शासनाची जबाबदारी असून त्यासाठी दारू व इतर नशेली पदार्थावर बंदी घालणे हे राज्य शासनाचे कर्तव्य असताना राज्य शासन पैशाच्या लालसे पोटी कायदा धाब्यावर बसवित आहे. त्यामुळे 10 फेब्रुवारी 2020 सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नुसार अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3 (1) V नुसार आपल्या आदर्श व्यक्ती...

"जागतिक पॅथॉलॉजी दिना निमीत्त श्री अनिल बिडकर यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा"

इमेज
जगदीश का. काशिकर,  कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नांदेड: दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागतिक पॅथॉलॉजी दिवस साजरा केला जातो. हा दिवस आपल्या समाजातील डॉक्टर्स तसेच सर्वसामान्य माणसांना पॅथॉलॉजी विषया बद्दल माहिती आणि जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. पॅथॉलॉजी ही एक मॉडर्न मेडिसिन ची स्पेशालिटी आहे ज्यामध्ये आपण रोगांचे निदान करण्यासोबतच त्याच्या मूळ कारणाशी पोहोचू शकतो. पॅथॉलॉजी शास्त्रामध्ये जे डॉक्टर पदव्युत्तर शिक्षण घेतात त्यांना पॅथॉलॉजिस्ट म्हणतात. पॅथॉलॉजिस्ट बनण्यासाठी एमबीबीएस नंतर तीन ते पाच वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण घ्यावे लागते. पॅथॉलॉजिस्ट हे आपल्या शरीरातील रक्त, लघवी ,मल ,थुंकी, कोषांचे द्रव्य आणि गाठींची तपासणी करून रोगनिदान करतात. पॅथॉलॉजी लॅब मध्ये जरी आपल्याला मोठे मोठे मशीन दिसत असले आणि असा समज असला की नमुना मशीन मध्ये घातला की रिपोर्ट तयार होतात तर असं नसून लॅबोरेटरी मॅनेजमेंट ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे. त्याला उत्तम दर्जाच्या मशीन ,टेस्ट टाकायला क्वालिफायड तंत्रज्ञ (टेक...