जि प चे माजी उपाध्यक्ष संदीप करपे यांना ठार मारण्याची धमकी

जि प चे माजी उपाध्यक्ष संदीप करपे यांना ठार मारण्याची धमकी दरारा 24 तास न्यूज नेटवर्क चंद्रपूर:जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संदीप करपे यांना आज अज्ञात इसमाने सुरजागड विरोधात आंदोलन कराल तर अपघातात ठार करू अशी धमकी दिली आहे. त्यामुळे गोंडपिपरी शहरात खळबळ उडाली आहे.येत्या 14 जून रोजी गोंडपिपरीत सुरजागड प्रशासनाविरोधात सर्वपक्षीय आंदोलन होणार आहे. यात संदीप करपे यांची अग्रणी भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर ही धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे. या प्रकाराची तक्रार गोंडपिपरी पोलिसात दाखल करण्यात आली असून पोलिसांनी चौकशीला सुरवात केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवावर उठला आहे. प्रकल्पाच्या वाहणांनी अनेकांचे जीव घेतले आहेत. कायमचे अपगंत्व आल्याने अनेक सामान्यांचे जीवन अंधःकारमय झाले आहे. गेल्या महिनाभरात अपघातांच्या संख्येत मोठी भर पडली. एवढेच नव्हे तर मार्गावरील घरात हायवा घुसला. वारंवार असे गंभीर प्रकार घडत असतांना अनेकांनी मागणी करूनही प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. यामुळे गोंडपिपरीत या मुद्द्यावर आंदोलन करण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आ...