महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आमदार आदित्य साहेब ठाकरे यांचा आज 33 वा वाढदिवस.त्यांचा वाढदिवसा निमित्याने गोंडपिपरी शिवसेना ( ठाकरे ) गटाने 33 वृक्षांचे वृक्षारोपण करीत वाढदिवस साजरा केला.
सोबतच ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करीत सामाजिक बांधिलकी जोपासली.सदर कार्यक्रम शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे, युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे, जिल्हा उपप्रमुख संदीप करपे,शिवसेना गोंडपिपरी तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांच्या मार्गदर्शनात युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते,शिवसेना शहर प्रमुख विवेक राणा यांच्या पुढाकारातून पार पडला.यावेळी नगरपंचायत उपनगराध्यक्ष सारिका मडावी,नगरसेवक यादवराव बांबोळे,तालुका संघटक शैलेशसिंह बैस,शहर प्रमुख आनंदराव गोहने,बाजार समिती संचालक समीर निमगडे,संचालक चंद्रजित गव्हारे, तालुका उपसंघटक बालू झाडे,शहर उपप्रमुख रियाज कुरेशी,जोगापुर शाखा प्रमुख पंकज डांगी,चिंतामणी कॉलेजचे प्राचार्य डॉ मोहन गिरिया, आक्सापुर शाखा प्रमुख दर्शन वासेकर यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Thanks for reading