पोस्ट्स

सावली लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आम्ही अष्टवधान"मंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

इमेज
"आम्ही अष्टवधान"मंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी  सावली: तालुक्यातील खेडी येथे आम्ही अष्टवधान मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.    कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक समाजसेवक देवाजी तोफा,     सरपंच सचिन काटपल्लीवार,माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, उपसरपंच मुक्ता गडतुलवार, ग्रा.पं.सदस्या शालू अलाम,माया माचेवार,सोमेश्वर कंचावार, परशुराम मर्लावार, पोलीस पाटील कृपाल दुधे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक परमानंद जेंगठे, विवेक दुधे,सुमित्रा कुंभरे, नवनीत कंदलवार,सुजित दंडावार यांची उपस्थिती होती . समाजसेवक देवाची तोफा यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.  यावेळी देवाजी तोफा यांनी शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.गावाचा विकास करायचे असेल तर सर्वांचे सहकार्य असने गरजेचे आहे.गावविकासासाठी नवनवीन कल्पना राबवली जावीत असे हि ते यावेळी सांगितले.शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्राविण्य मिळवले पाहिजे असा मौलिक सल्लाही यावेळी त्यांनी दिला.शिवजयंती निमित्त मंडळातर्फ...

दोन दुचाकीच्या अपघातात तीन जण ठार तर तीन गंभीर जखमी सावली तालुक्यातील दुर्घटना

इमेज
दोन दुचाकीच्या अपघातात तीन जण ठार तर तीन गंभीर जखमी सावली तालुक्यातील दुर्घटना सावली: सावली ते गडचिरोली या मुख्य महामार्गावर व्याहाड खुर्द येथील रोहनकर पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकी मध्ये जोरदार धडक होऊन या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले असून त्यांचे वर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पांडुरंग सहारे वय 35 वर्ष राहणार नांदगाव, सागर रघुनाथ शेडमाके राहणार हिरापूर, प्रशांत आत्राम अशी मृतांची नावे आहेत.

शासनाच्या स्पर्धेच्या पत्रकात सावलीचा बसस्थानकाचा फोटो! शिंदे-फडणवीस सरकार चे नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी मानले आभार

इमेज
महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छ व सुंदर बसस्थानक ही स्पर्धा सुरू केली आहे त्याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर अभियान असे नाव दिले असून या स्पर्धा पत्रके शासनाचा वतीने जाहीर करण्यात आले. त्यात स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा फोटो तसेच त्यात सावली बसस्थानकाचा फोटो टाकण्यात आलेला आहे.ही पत्रके संपूर्ण महाराष्ट्र भर फिरणार आहे. महाराष्ट्र मध्ये सावली चा बसस्थानक हा जाणार आहे. त्यामुळे सावली वासीयांसाठी ही गौरविण्यात येणारी बाब असून शासनाच्या स्पर्धेच्या प्रचार यंत्रणेत सावली बसस्थानकाचा फोटो दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,पालकमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार, खासदार अशोकजी नेते,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार व माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे सह शिंदे-फडणवीस सरकार चे आभार सावली येथील नगरसेवक, गटनेता तथा भाजप महामंत्री सतीश बोम्मावार यांनी मानले आहे.

सावलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर

इमेज
सावली :  महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मीक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सावली या कार्यालयाच्या वतीने दि. १९ मे 2023 रोजी १० वाजता पंचायत समीती सभागृह सावली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.        महिलांना शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.        सदर कार्यक्रम तहसीलदार सावली यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे. महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच शासकीय यंत्रणेकडून महिलांच्या अडचणींची सोडवणुक करून महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा मिळावी या उद्देश पूर्ती करिता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.        सदर शिबिरास, तहसील कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीसठाणे, शिक्षणाधिकारी (गट), विधी सेवा प्राधिकरण, तालुका कृषी विभाग, भुमी अभिलेख, पशुसंवर्धन, समा...

खेडी येथिल महिला वाघाच्या हल्ल्यात ठार: आठवड्यातील तिसरी घटना

इमेज
सावली।तालुका प्रतिनिधी       वाघाचे हल्ले दिवसेंदिवस वाढतच आहेत,यात अनेक जीवांचे नाहक बळी जात आहेत.मात्र वनविभाग वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरले आहे.         काल दीनांक १३ डिसेंबर रोजी तालुक्यातील रूद्रापूर येथिल बाबुराव कांबळे यांचा वाघाने बळी घेतला होता.ही घटना ताजी असतानाच आज दिनांक १६ डिसेंबर रोजी तालुक्यातील खेडी येथिल महिला वाघाच्या जबड्यात ठार झाली.स्वरुपा प्रशांत येलेटीवार वय ५० वर्षे असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.      सतत वाघाचे हल्ले होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

वाघाच्या हल्ल्यात रुद्रापूर येथील शेतकरी ठार: हप्ताभरातील दुसरी घटना

इमेज
सावली: प्रतिनिधी सावली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या व सावली पासून 5 किमी अंतरावरील रुद्रापूर येथील शेतकरी बाबुराव बुद्धाजी कांबळे वय 65 वर्ष हे रोजच्याप्रमाणे  आपल्या शेताकडे जाण्यासाठी निघाले असता वाटेत दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्या वर हल्ला करीत त्यांच्या मानेला पकडून जंगल परिसरात घेऊन गेला.         वाघ माणसाला नेत असल्याचे दिसून येताच गावकरी त्या घटनास्थळावरून त्या दिशेने गेले व पाहणी करू लागले.या घटनेची माहिती वनविभाग सावली व पोलीस स्टेशन सावली ला देण्यात आली.दोन्ही चमू घटनास्थळी उपस्तीत झाले. वाघाचे हल्ले दिवसेंदिवस वाढत असून यावर वनविभाग कसलेही उपाययोजना करण्यास असमर्थ ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. घटनास्थळा पासून काही दूर अंतरावर बाबुराव कांबळे यांचे मानेपासून खाल्लेले प्रेतच सापडले.त्यानंतर वनविभागाने पंचनामा करून शव विच्छेदन साठी प्रेत सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.या घटनेने मात्र खळबळ माजली असून शेतकरी भयभीत झाले आहे. सावली तालुक्यातील या आठवड्यात ही दुसरी घटना घडली असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केल...