सावली।तालुका प्रतिनिधी
वाघाचे हल्ले दिवसेंदिवस वाढतच आहेत,यात अनेक जीवांचे नाहक बळी जात आहेत.मात्र वनविभाग वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरले आहे.
काल दीनांक १३ डिसेंबर रोजी तालुक्यातील रूद्रापूर येथिल बाबुराव कांबळे यांचा वाघाने बळी घेतला होता.ही घटना ताजी असतानाच आज दिनांक १६ डिसेंबर रोजी तालुक्यातील खेडी येथिल महिला वाघाच्या जबड्यात ठार झाली.स्वरुपा प्रशांत येलेटीवार वय ५० वर्षे असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
सतत वाघाचे हल्ले होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading