जागतिक पत्रकार दीना निमित्ताने लिहिलेले पत्रकारिताचे वास्तव:

आज पत्रकार दिवस मीडियातील सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा मित्रांनो, आजकाल पत्रकारिता करणे फारच कठीण काम झाले आहे.कारण ज्याची बातमी दिली व ज्याचा विषय मांडला तो प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शत्रू होतो व आपल्यावर डुख-डाव धरून राहतो.वेळप्रसंगी तो आपली चूक शोधत राहतो व खोटानाटा कोणताही गुन्हा टाकण्याचा तो प्रयत्न करतो. काही राजकीय लोक तर नेहमीच आमच्या मागे जाळे लावलेला तयारच असतात.कारण मीडियातील 50 टक्के बातम्या या राजकारणावर असतात व नेत्यांच्या आर्थिक लफड्यांवरच असतात. म्हणून 90% पत्रकार हे केवळ सामान्य बातम्या देऊन मोकळे होतात. जोखमीची बातमी कोणताही पत्रकार सहसा टाळत असतो. म्हणून अतिशय दोन-चार पत्रकारच मोठ्या हिमतीने लिहीत असतात, व्हिडिओ टाकत असतात व शोध पत्रकारिता करून बातम्या देत असतात. बातमीमुळे आमची बदनामी झाली. आमच्याकडून खंडणी मागितली. पेड न्युज दिली. आमच्याकडून पैसे मागितले. विरोधकांनी आमच्या मागे तुम्हाला आर्थिक सुपारी देऊन लावले आहे तुम्ही अमुक अमुक पक्षाचीच व मी त्याचीच बाजू घेऊन बातमी देऊन तो लेख लिहितात. हे क्षेत्र असं आहे की उत्पन्न शून्य,पण शत्रुत्व मात्र शंभर टक्के असते. कोळश...