पोस्ट्स

बिहार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली 18 विद्यार्थी बेपत्ता

इमेज
विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली 18 विद्यार्थी बेपत्ता पटना:बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये नदीत लहान मुलांनी भरलेली बोट उलटली आहे. या दुर्घटनेत २० मुलांना वाचवण्यात यश आलं असून अद्यापही १६ हून आधिक मुलं बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळालीये. सदर घटनेची माहिती मिळताच शोध आणि बचावकार्यास सुरूवात झाली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गायघाट येथील बेनियाबाद ओपी परिसरातील मधुपट्टी घाटात ही बोट पलटी झाली. बोटीतून सुमारे ३३ लहान मुलं प्रवास करत होते. शाळकरी मुलांची बोट नदीत पलटल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. नदीमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने बोट बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बेपत्ता मुलांचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

बोगस डॉक्टर च्या उपचारांमुळे महिलेचा गर्भपात- अर्भक दिले कुत्र्याला खायला, महिलेचाही मृत्यू

इमेज
हाजीपूर: बिहार मधील हाजीपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.एका बोगस डॉक्टर दाम्पत्याकडे उपचारासाठी गेलेल्या महिलेचा गर्भपात झाला.या दरम्यान महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिचाही मृत्यू झाला.     या बोगस डॉक्टर पुरावे नष्ट करण्यासाठी भ्रुण कुत्र्यांना खायला घातला.कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.यानंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता ही खळबळजनक बाब उघडकीस आली.पोलीस तपासात सदर नर्सिंग होम देखील बेकायदेशीर असल्याचे उघड झाले आहे.तसेच या डॉक्टर दाम्पत्याकडे एमबीबीएस ची डिग्री नसल्याचेही उघड झाले आहे. घटनेनंतर डॉ. दाम्पत्य फरार झाले आहेत.