*पाणीप्रश्नावरून पोंभूर्णा येथील गट विकास अधिकाऱ्याच्या अंगावर फेकले गढुळ पाणी* *" तुम्ही पिता RO चे पाणी ' जनता पिणार गढूळ पाणी - संदिप गिऱ्हे* *-संतापलेल्या नागरिकांसह शिवसैनिकांचा ताबा सुटला* *-पोंभूर्णा पंचायत समितीवर घागर फोड आंदोलन* *-आंदोलकांवर गुन्हे दाखल*क्ष

*पाणीप्रश्नावरून पोंभूर्णा येथील गट विकास अधिकाऱ्याच्या अंगावर फेकले गढुळ पाणी* *" तुम्ही पिता RO चे पाणी ' जनता पिणार गढूळ पाणी - संदिप गिऱ्हे* *-संतापलेल्या नागरिकांसह शिवसैनिकांचा ताबा सुटला* *-पोंभूर्णा पंचायत समितीवर घागर फोड आंदोलन* *-आंदोलकांवर गुन्हे दाखल* पोंभूर्णा :- पोंभूर्णा तालुक्यातील १५ गावांना पाणीपुरवठा करणारी वेळवा येथील ग्रीड पाणीपुरवठा योजना मागील दीड महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांवर दुषीत पाणी पिण्याची वेळ आली असल्याने संतापलेल्या नागरिकांना घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वात नागरिक व असंख्य शिवसैनिक पोंभूर्णा पंचायत समिती येथे दाखल होत गटविकास अधिकाऱ्याच्या दालनासमोर आधी घागर फोडण्यात आले व नंतर गट विकास अधिकाऱ्याशी चर्चा करीत असताना अधिकाऱ्याकडून उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी गट विकास अधिकाऱ्याच्या अंगावर गढुळ पाणी फेकण्यात आले. हे पाणी अंघोळ करू शकत नाही तर जनता असे पाणी पिऊन राहिली आहे. साधारण ३० कोटी रूपये खर्च करून १५ गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळेल यासाठी ग्रीड योजना सुरू करण्यात आली. मा...