पोस्ट्स

गोंदिया लेबलसह पोस्ट दाखवत आहे

*धक्कादायक; विहिरीत शॉक लागून चौघांचा मृत्यू*😂 *गोंदिया जिल्ह्यातील सरांडी गावातील दुर्दैवी घटना*

इमेज
*धक्कादायक; विहिरीत शॉक लागून चौघांचा मृत्यू* *गोंदिया जिल्ह्यातील सरांडी गावातील दुर्दैवी घटना* गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सरांडी गावात एक दुखद घटना घडली आहे. घरगुती विहिरीतील मोटार पंप दुरस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या एकाचा जीव वाचवतांना चौघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खेमराज साठवणे, सचिन भोंगाडे, प्रकाश भोंगाडे व महेंद्र राऊत अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खेमराज साठवणे यांच्या घरी असलेल्या विहीरीच्या विद्युत पंपाची दुरुस्ती करण्यासाठी साठवणे हे विहिरीत उतरले. मात्र, वीज प्रवाह सुरू झाल्याने साटवणे यांचा विहीरीतच मृत्यू झाला. ते बराच वेळ विहिरी बाहेर न आल्याने सचिन भोंगाडे खाली उतरले. त्यांना वाचविण्याकरता प्रकाश भोंगाडे व महेंद्र राऊत देखील उतरले असता विजेचा शॉक लागून दोघांचाही विहिरीतच मृत्यू झाला. या घटनेमुळं सरांडी गावावर शोककळा पसरली आहे. मोटार सुरु होत नसल्यानं खेमराज साठवणे विहिरीत उतरले होते. विहिरीत उतरल्यानंतर सर्वात प्रथम त्यांना विजेचा धक्का लागला. त्यांच्या पाठोपाठ विहिरीत उतरले...

ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचे बॅनर फाडले

इमेज
एकीकडे निवडणुकीचा प्रचार मात्र अज्ञात इसमांचे बॅनर फाडण्याकडे लक्ष एका गावात नागरिकांनी चक्क बॅनरच फाडले गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. https://youtu.be/aaC5sg-pxG4 मात्र प्रचारासाठी लावण्यात आलेला बॅनरवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार ब्लेडने मारून बॅनर फाडण्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या भडंगा येथील वार्ड क्रमांक एक मध्ये उघडकीस आली आहे. ग्राम विकास परिवर्तन पॅनल चे बॅनर वार्ड क्रमांक एक येथिल तेली टोल्यावरील मध्यंतरी चौकात बॅनर लागले असून रात्री च्या वेळी काही अज्ञात नागरिकांनी ब्लेड मारून बैनरला फाडण्यात आले. कोणत्याही नागरिकांनी बॅनर फाडणाऱ्या इसमाना बघितले नाहि. असे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले... भडंगा येथील वार्ड क्रमांक एक मधिल हनुमान मंदिराजवळच्या चौकात ग्राम विकास परिवर्तन पॅनलचे उमेदवारांचे अंदाजे आठ बाये बाराचे बॅनर चा बोर्ड चौकात लागला होता प्रितीलाल तुरकर, बबलू सोनवांणे, राकेश बघेले यांचा घराजवळील चौका मध्ये बॅनर लागला होता .... ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे निवडणुक ल...

शौचालयात फेकले जिवंत बाळ, महाराष्ट्रातील गोंदियात खळबळ

इमेज
गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या शौचालयात एक जिवंत अर्भक आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत हा प्रकार कोणी केला आहे याबाबत अद्यापही कोणताही पुरावा हाती लागला नसल्याची माहिती आहे.         शाळेतील शौचालयात रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तीने तर भाग टाकून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. विशेष म्हणजे या शाळेला काही बाजूने भिंतीचे मोठे कंपाउंड असून गेट बंद असतानाही येथे अर्भक टाकण्यात आले. प्राथमिक शाळा परिसरात प्रसूती झाल्याची माहिती समोर येत आहे. शाळेत अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या अर्भकाला सडक अर्जुनी येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.