पोस्ट्स

जीवती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जिवती येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्नाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न.

इमेज
जिवती :-- जिवती येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा मोठय़ा उत्साहात पार पडला. सर्वप्रथम सकाळी १० : ३० वाजता समितीचे अध्यक्ष सुग्रीव गोतावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिवती येथील पंचशील ध्वज ते अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे ठिकाणापर्यंत मोटारसायकल रॅली, प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर दुपारी २:३० वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्नाकृती पुतळ्याचे अनावरण व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे होते तर प्रमुख अतिथी लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, मातंग समाज समन्वय समितीचे अध्यक्ष सुग्रीव गोतावळे, कलाम साहेब, के. मूर्ती, डॉ. मिलिंद शिखारे, नरसिंग मोरे, नगराध्यक्ष कविता आडे, अमर राठोड, संजय कथाडे, राजू येले, गणपत आडे, महेश देवकते, विनोद दत्तात्रेय, आनंद भालेराव, प्रकाश कांबळे, नगरसेविका सतलुबाई जुमनाके, पुष्पाताई नैताम, अनिता गोतावळे, जी एस कांबळे, उद्धव कांबळे, डॉ. अंकुश गोतावळे उपनगराध्यक्ष, देविदास कांब...