पोस्ट्स

मुल - पोंभुर्णा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कालपासून नांदगाव शेत शिवारात वाघाचा मुक्काम- फॉरेस्ट डिपारमेंट का पिंजरा रह गया खाली- शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण

इमेज
          विजय जाधव: काल दिनांक ८ एप्रिल 2023 ला नांदगाव गोवर्धन च्या मध्यंतरी श्री. भास्कर आंबटकर यांच्या मालकीच्या मक्याच्या पिकात वाघ आढळून आला. रस्त्याने जाणारे वाहनधारक प्रत्यक्ष वन विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतकरी पादचारी या सर्वांनी वाघाचे दर्शन घेतले. सकाळी नऊ वाजता पासून वाघाला बघण्यासाठी असंख्य लोकांची गर्दी उसळलेली होती. तब्बल दोन तासाने वन विभागाचे कर्मचारी उपस्थित झाले. परंतु दिवसभरात वाघाला पकडण्याची कोणतीही कारवाई झाली नाही.         सायंकाळी साडेसहा वाजता च्या दरम्यान शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वन विभागातर्फे वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावला. तसेच वासराला पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आले. परंतु रात्री अकरा वाजेपर्यंत वाघ पिंजऱ्यात येऊ शकला नाही. रात्र झाल्याने बघ्यांची गर्दी कमी झाली. लोक आपापल्या घरी गेले. वन विभागाचे कर्मचारी वाघाला पकडण्यासाठी तैनात होते. प्रस्तुत प्रतिनिधीने आज सकाळी प्रत्यक्षात पाहणी करून भ्रमणध्वनी द्वारे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला विचारणा केली असता वाघ निघून गेल्याचे सांगण्यात आले. परंतु वाघ कोणत्या द...