पोस्ट्स

पोभुर्णा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वसंत येलमुले यांचे दुःखद निधन। कुटुंबावर शोक कळा

इमेज
वसंत येलमुले यांचे दुःखद निधन। कुटुंबावर शोक कळा पोंभुर्णा प्रतिनिधी तालुक्यातील जुनगाव येथील अल्पभूधारक शेतकरी वसंत केशव एलमुले वय 66 वर्ष यांचे आज दुपारी दीड वाजताचे सुमारास दुःखद निधन झाले. वसंत येलमुले हे आपल्या मुलीच्या गावी म्हणजेच चामोर्शी तालुक्यातील सगनापूर येथे गेले होते तिथेच त्यांना लकवा मारल्याच्या कारणावरून भेंडाळा येथे दाखल करण्यात आले होते. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना गडचिरोलीला रेफर दिला. गडचिरोलीतील डॉक्टरांनी चंद्रपूर च्या दवाखान्यात पाठविले. तिथे त्यांचा उपचार सुरू असतानाच आज सोमवारी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यांच्या मृत्यूची वार्ता गावात पसरतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता वैनगंगा नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.  त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन विवाहित मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.  घरातील कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर आघात झालेला आहे.

देवाडा बुज. ते पिंपरी देशपांडे पोचमार्गाची दुर्दशा- अनेकदा निवेदन देऊनही समस्या कायम ! ताबडतोब रस्त्याची मंजुरी करून काम करावे-भाजपाचे दिनेश बदन यांची मागणी

इमेज
देवाडा बुज. ते पिंपरी देशपांडे पोचमार्गाची दुर्दशा- अनेकदा निवेदन देऊनही समस्या कायम ! ताबडतोब रस्त्याची मंजुरी करून काम करावे-भाजपाचे दिनेश बदन यांची मागणी  पोंभर्णा: तालुक्यातील देवाळा बुद्रुक ते पिपरी देशपांडे हा पोचमार्ग वर्षानुवर्षापासून रखडलेला आहे. दोन वर्षांपूर्वी एमआरईजीएस द्वारे या रस्त्याचे माती काम करण्यात आले असल्याची माहिती आहे परंतु हा रस्ता खडीकरण मुरमीकरण न झाल्यामुळे  या मार्गावरील शेतकऱ्यांना व आवागमन करणाऱ्याना, नागरिकांना प्रचंड चिखलातून चिखल तुडवत यावे- जावे लागते.  या विभागाचे आमदार तथा पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना सुद्धा या संबंधाने निवेदन दिले आहेत. तसेच स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना सुद्धा निवेदना द्वारे या रस्त्यासाठी मागणी केलेली असताना आज तागायत या रस्त्यावर कुठलेही काम झाले नाही. त्यामुळे या रस्त्यावर पावसाळा भर चिखलाचे साम्राज्य असते. निवडणूक आली तर आस्वानांचा भडीमार केल्या जातो परंतु निवडणूक संपली की जो तो आपल्या बिळात लपून बसतो अशीच अवस्था ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बाबतीत व इतर विकास कामांच्या बाबतीत झालेली पाहायला मिळते. दिनेश बदन,भ...

*पोंभूर्णा तालुक्यातील चेक बल्लारपुर व उमरी पोतदर येथे शिवसेनेची बैठक संपन्न*

इमेज
*पोंभूर्णा तालुक्यातील चेक बल्लारपुर व उमरी पोतदर येथे शिवसेनेची बैठक संपन्न* ▪️ जनतेच्या समस्यांसाठी मी तत्पर - जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे ▪️ भगवा सप्ताह व जनजागृती अभियानाची झाली तालुक्यातून सुरुवात   पोंभूर्णा :- तालुक्यातील चेक बलारपुर व उमरी पोतदार येथे काल दि. ८ ऑगस्ट ला सायंकाळी शिवसेना (उध्दव  बाळासाहेब ठाकरे) वतीने भगवा सप्ताह, जनजागृती अभियान,निमित्त बैठक घेण्यात आली.या बैठकीला शिवसेना चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम,जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे, व पोंभूर्णा शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी पक्षाच्या  आढावा बैठकीत जनतेच्या समस्या व शासनाच्या योजनांची फसवेगिरी,महायुतीचे सरकार कसे शेतकरी विरोधी आहे हे पटवून दिले.शेतकऱ्यांचे प्रश्न,पिक विमा,अतिवृष्टी,याबाबत शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी या साठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजनाची तयारी सुरू आहे.जनतेच्या समस्यासाठी मी सदैव तत्पर राहील असे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलत होते. भगवा सप्ताह निमित्त झालेल्या बैठकीत उमरी प...

नगरपंचायत सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू; आठ महिन्यांपासून मानधन थकले - तीन दिवसांपासून शहरात कचाऱ्याचे ढीग, घाणीमुळे पसरली दुर्गंधी -नगरपंचायत प्रशासनाला दिले निवेदन

इमेज
नगरपंचायत सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू; आठ महिन्यांपासून मानधन थकले - तीन दिवसांपासून शहरात कचाऱ्याचे ढीग, घाणीमुळे पसरली दुर्गंधी -नगरपंचायत प्रशासनाला दिले निवेदन पोंभूर्णा :-दरारा 24 तास  पोंभूर्णा नगरपंचायतच्या सफाई कामगारांचे काम करूनही आठ महिन्यांचे मानधन थकले असल्याने सफाई कामगारांनी दोन दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलेला आहे. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे मानधन संबंधित पाठपुरावा करून सुद्धा कुणीच लक्ष देत नव्हते.पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे सर्व सफाई कामगारांनी दोन दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले असून तात्काळ मानधन न दिल्यास आंदोलन तीव्र करू असा इशाराही देण्यात आला आहे. पोंभूर्णा शहराच्या स्वच्छतेसाठी सफाई कामगार काम करतात.मात्र जेव्हा त्यांना पगार द्यायची वेळ आली तर फंड नसल्याचे कारण पुढे केल्या जाते.महिनाभर काम करून पगार न मिळाल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांचे मानधन न मिळाल्याने तीन दिवसापासून सफाई कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सफाई कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी सामुहिक आ...

खासदार बाळूभाऊ धानोरकर आज पोंभुर्णा तालुक्याच्या दौऱ्यावर

इमेज
पोंभुर्णा: काँग्रेसचे खासदार बाळू भाऊ धानोरकर हे आज दिनांक १ डिसेंबर रोजी पोंभुर्णा तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवींद्र भाऊ मरपलीवार यांनी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. खासदार धानोरकर हे घोसरी येथे दुपारी दीड वाजताच्या सुमारास उपस्थित होणार असून त्यानंतर ते दोन वाजता देवाडा बुद्रुक, चेक ठाणा, मोहाळा व अन्य गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असून नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून समस्यांचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवींद्र जी मरपल्लीवार यांनी केले आहे. सायंकाळी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक होऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन खासदार महोदय करणार आहेत. या संधीचा फायदा घेऊन आपल्या अडी अडचणी, शेत पिकातील नुकसान, वाघाची भीती,वन विभागाच्या, कृषी विभागाच्या, महसूल विभागाच्या व इतर सर्व विभागाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नागरिकांनी आपापली निवेदने अर्ज घेऊन उपस्थित राहावे...