- तीन दिवसांपासून शहरात कचाऱ्याचे ढीग, घाणीमुळे पसरली दुर्गंधी
-नगरपंचायत प्रशासनाला दिले निवेदन
पोंभूर्णा :-दरारा 24 तास
पोंभूर्णा नगरपंचायतच्या सफाई कामगारांचे काम करूनही आठ महिन्यांचे मानधन थकले असल्याने सफाई कामगारांनी दोन दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलेला आहे.
याबाबत अनेकदा प्रशासनाकडे मानधन संबंधित पाठपुरावा करून सुद्धा कुणीच लक्ष देत नव्हते.पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे सर्व सफाई कामगारांनी दोन दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले असून तात्काळ मानधन न दिल्यास आंदोलन तीव्र करू असा इशाराही देण्यात आला आहे.
पोंभूर्णा शहराच्या स्वच्छतेसाठी सफाई कामगार काम करतात.मात्र जेव्हा त्यांना पगार द्यायची वेळ आली तर फंड नसल्याचे कारण पुढे केल्या जाते.महिनाभर काम करून पगार न मिळाल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांचे मानधन न मिळाल्याने तीन दिवसापासून सफाई कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
सफाई कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी सामुहिक आंदोलन पुकारले असल्याने पोंभूर्ण्यातील रस्त्यावरील कचरा उचलल्या जात नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. त्यामुळे नागरीकांवर सुध्दा दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. नगरपंचायत क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून कचरा वाहतूकीची परिस्थिती बिकट होती.असे असताना सफाई कामगार यांचे काम बंद आंदोलन हे नागरीकांना त्रासदायक ठरूं पाहत आहे.ऐन पावसाळ्यात होत असलेल्या या प्रकाराने नागरीकांना आरोग्याची चिंता सतावत आहे.ठिकठिकाणी साचलेला हा कचरा वेळीच उचलला गेला नाही, तर नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊन साथीचे रोग पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांनी संताप व्यक्त केला असून नगरपंचायत प्रशासनाला जबाबदार धरले आहे.
------------
नगरपंचायतच्या सफाई कामगारांचे आठ महिन्यांचे मानधन थकले असल्याने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देऊन निवेदनाद्वारे बेमुदत काम बंद करणार असल्याचा ईशारा देण्यात आले.
------
शहर सुंदर राहण्यासाठी दिवस-रात्र राबणाऱ्या सफाई कामगारांच्या हातात आठ महिन्यांपासून मानधन मिळत नसने हि भाजपाची सत्ता असलेल्या नगरपंचायतसाठी अशोभनीय गोष्ट आहे. कामगारांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने जीवितार्थ चालविणे मुश्किलीचे होत आहे. त्यामुळे कामगारांचे थकीत पगार ताबडतोब अदा करावे. तसेच यापुढेही त्यांचे मानधन वेळेवर द्यावे.
-आशिष कावटवार,विरोधी पक्षनेता नगर पंचायत पोंभूर्णा
0 Comments