पोस्ट्स

चिमूर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भाजपा महीला आघाडी तर्फे 24 ऑगस्टला चिमूरात रक्षाबंधन कार्यक्रम/ सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती

इमेज
भाजपा महीला आघाभाजपा महीला आघाडी तर्फे 24 ऑगस्टला चिमूरात रक्षाबंधन कार्यक्रम/ सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थितीडी तर्फे 24 ऑगस्टला चिमूरात रक्षाबंधन कार्यक्रम/ सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर               7887325430 चिमूर : चिमूर तालुक्यांत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भाजपा महीला आघाडी चिमूर तालुका तर्फे रक्षाबंधन कार्यक्रम अभ्यंकर मैदान किल्ला परीसर चिमूर येथे मोठया प्रमाणात आयोजित करण्यात आलेला आहे. सदर रक्षाबंधन कार्यक्रमाला मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची विशेष उपस्थित राहणार आहे. तर चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांना तालुक्यांतील हजारो लाडक्या बहिणी ओवाळणी करुन राखी बांधून येणाऱ्या समोरील विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करावेत. आम्ही बहिणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत म्हणून शुभ आशीर्वाद सुद्धा याक्षणी देणार आहेत. सदर कार्यक्रम दि. २४ ऑगस्ट २०२४ शनिवारला दुपारी १२ वाजता आयोजित केलेला असून या कार्यक्रमाला तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहू...

*समाजवादी गणराज्य पार्टी चिमूर तालुका अध्यक्षपदी रावन शेरकुरे यांची नियुक्ती*

इमेज
*समाजवादी गणराज्य पार्टी चिमूर तालुका अध्यक्षपदी रावन शेरकुरे यांची नियुक्ती* ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर          7887325430 चिमूर:- समाजवादी गणराज्य पार्टी अध्यक्ष कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात महासचिव अतुल देशमुख,प्रदेशाध्यक्ष अजित शिंदे यांनी समाजवादी गणराज्य पार्टीच्या चिमूर तालुका अध्यक्षपदी रावन शेरकुरे यांची नियुक्ती केली.रावन शेरकुरे यांना नियुक्तीचे पत्र सामाजिक कार्यकर्ते ऍड.भूपेश पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी आशिष वाघमारे,निलेश कोसे, नितीन पाटील,प्रल्हाद बोरकर,मनोज राऊत आदी उपस्थित होते. शिक्षण,समता, प्रतिष्ठा,संधी आणि सत्ता प्रत्येकाच्या वाट्याला यावी यासाठी लोकशाही, धर्मनिरपेक्ष,समाजवादी आणि विज्ञानाभिमुख समाजरचनेसाठी समाजवादी गणराज्य पार्टी कार्यरत आहे. रावन शेरकुरे यांची समाजवादी गणराज्य पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

अनु. जाती, जमाती, भटक्या जाती व इतरमागासवर्गीयांच्या समस्यांबाबत उपमुख्यमंत्री सोबत सकारात्मक चर्चा

इमेज
अनु. जाती, जमाती, भटक्या जाती व इतरमागासवर्गीयांच्या समस्यांबाबत उपमुख्यमंत्री सोबत सकारात्मक चर्चा ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर      7887325430 भिसी दि.२० : १६ ऑगस्ट २०२४ ला शहीद स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले असता, यावेळी गजानन गुळधे, सुभाष नन्नावरे, महाराष्ट्र राज्यध्यक्ष विद्यार्थी संघटना संदीप धारने संशोधन प्रमुख, रणजित साव साकडे चिमूर अध्यक्ष विद्यार्थी संघटना, शंकर नन्नावरे महाराष्ट्र सदस्य विद्यार्थी संघटना यांनी भेट घेवून अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्या समस्येबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या 'चे सोबत महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम २००० मध्ये सुधारणा करण्याबाबत आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन याचे पत्र दिनांक ७ ऑगस्ट २०२४ ला निर्गमित झाले हे पत्र अनुसूचित जाती, जमाती भटक्या जाती व इतर मागासवर्गीय या 'च्यावर अन्याय करणारे आहे. त्यामुळे हे...

श्रीगुरुदेव सेवा मंडळ, खडसंगी तर्फे सामाजिक सभागृह बांधकाम करीता खासदारांना दिले निवेदन

इमेज
श्रीगुरुदेव सेवा मंडळ, खडसंगी तर्फे सामाजिक सभागृह बांधकाम करीता खासदारांना दिले निवेदन ✍️ शार्दूल पचारे प्रतिनिधी चिमूर         7887325430 चिमूर : - खडसंगी येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ मागील ४४ वर्षांपासून कार्यरत असून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना तत्वज्ञान व प्रणालीनुसार प्रतीदिन सामुदायिक प्रार्थना लहान बालकांना सुसंस्कार करीता शिबीर उपक्रम, तसेच वार्षीक पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो.यात गावातील तसेव परीसरातील २० ते २५ गावातील नागरीकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. यात सुमारे ५ ते ६ हजार नागरीकांचा सहभाग असतो. यात विषेश म्हणजे सर्व-धर्म-समभाव प्रमाणे विविध जाती, धर्माचे व विविध पंथाचे नागरिक उपस्थित राहतात.या करीता श्री गरुदेव सेवा मंडळ, खडसंगी चा भव्य मोठा परीसर असून ०.६० आर जमीन हि नोंदणीकृत आहे. या ठिकाणी वर्ष भरात अनेक सामाजीक, सांस्कृतीक कार्यक्रम होत असतात सामने, क्रिकेट सामने, विविध सांस्कृतीक कार्यक्रम व अनेक लग्न सोहळे सुद्धा होत असतात. मात्र या ठिकाणी सर्व सोईसुविधा युक्त सामाजिक सभागृह नाही. त्यामुळे कार्यक्रमा प्रस...

बाईक रॅलीतून प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा केला प्रचार

इमेज
बाईक रॅलीतून प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा केला प्रचार ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर            7887325430 चिमूर:- दि.१९ : शासनाची योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचावी व त्याचा लाभ सर्वांना घेता यावा या उद्देशाने महावितरण कर्मचाऱ्यांनी बाईक रॅलीतून बॅनर आणि पॅम्पलेट घेउन नवा उपक्रम राबविला. संजय जळगावकर उपकार्यकारी अभियंता, उपविभाग चि मूर यांच्या मार्गदर्शनाखाली कृपाल लंजे कनिष्ठ अभियंता विज वितरण केंद्र भीसी व भीसी वीज वितरण केंद्रातील संपूर्ण कर्मचारी यांनी बाईक रॅलीतून प्रधानमंत्री सुर्य घर योजने चा प्रचार केला व लोकांना योजने चे ठळक मुद्दे पटवून दिले. ही योजना महावितरण च्या घरगुती ग्राहकांसाठी आहे तसेच सौर ऊर्जा पॅनलद्वारे केलेली वीजनिर्मिती ही घरगुती वापरापेक्षा जास्त झाल्यास ग्राहकांना विज बील शून्य येणार आहे व जास्त निर्मीत झालेली ऊर्जा महावितरण ला विकून उत्पन्न मिळवण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. आणि या योजने अंतर्गत एक कीलोवॉट सौर पॅनल वर ३०००० रुपये, दोन कीलोवॉट सौर पॅनल वर ६०००० रुपये व तीन कीलोवॉट व त्यापेक्षा जास्त सौर पॅनल वर ७८००० रुपये च...

"नेचर फाउंडेशन नागपूर" कलावंताचे कलापथक कार्यक्रम

इमेज
"नेचर फाउंडेशन नागपूर" कलावंताचे कलापथक कार्यक्रम ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर             7887325430 चिमूर:- दि.१९ इतर मागास बहुजन कल्याण विभाग सहाय्यक संचालक इतर मागास बहु जन कल्याण, चंद्रपूर चे वतीने १५ ऑगस्ट २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध शासकीय योजनांचा प्रचार व प्रचारासाठी तालुकास्तरीय मेळावा आयोजन करण्यात येत आहे. या निमित्याने आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथे विविध शासकीय योजना बद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. नीलकंठ शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती येथे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष, उपप्राचार्य धोटे मॅडम नीलकंठ शिंदे महाविद्यालय भद्रावती, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डहेगावकर, प्राचार्य डी. डी. दोहतरे कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय गौराळा, भद्रावती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मुख्याध्यापक पी. एफ, पवार यांनी केले. मार्गदर्शन कार्यक्रमा च्या सुरुवातीला कलापथक जनजागृती कार्यक्रम व माहिती रथ न...

भारतीय किसान संघटनेची जिल्हा कार्यकारणी गठीत - जिल्हाध्यक्षपदी जगदीश रामटेके

इमेज
भारतीय किसान संघटनेची जिल्हा कार्यकारणी गठीत - जिल्हाध्यक्षपदी जगदीश रामटेके चिमूर - शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर               7887325430           भारतीय किसान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी भा कि संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी जगदीश रामटेके यांची निवड केली असता जिल्हाध्यक्ष यांनी हुतात्मा स्मारक चिमूर येथे रविवारला सभा आयोजीत करून भारतीय किसान संघटनेची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी गठीत केली.       उपाध्यक्ष वामन लहानू गेडाम, सचिव गुलाब कचरू गेडाम, सहसचिव संदेश शंकर रामटेके, कोषाध्यक्ष मंगेश परसराम थेरकर, सल्लागार ॲड विलास मोहुर्ले , कार्याध्यक्ष दिपक विलास वाघमारे, संघटक नरेश तानबा गजभीये, सदस्य अशोक किसन भिमटे, सदस्य बंडू परसराम तराळे, सदस्य लालाजी शिवराम शेंडे आदी पदाधिकारी, सदस्य यांची निवड करण्यात आली. दरम्यान हि संघटना शेतकऱ्यासंदर्भात असल्याने जिल्हाध्यक्ष जगदीश रामटेके यांनी प्रत्येक पदाधिकारी, सदस्य यांना जबाबदारी वाटून दिली आहे.

भिक्षु ज्ञानज्योति महाथेरो यांच्या माध्यमातून विविध मागण्यांना घेऊन तहसील कार्यालयावर काढला भव्य मोर्चा भाजप सरकार विरोधी नारे देत काढण्यात आली रॅली

इमेज
भिक्षु ज्ञानज्योति महाथेरो यांच्या माध्यमातून विविध मागण्यांना घेऊन तहसील कार्यालयावर काढला भव्य मोर्चा भाजप सरकार विरोधी नारे देत काढण्यात आली रॅली ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर       7887325430 चिमूर:- दिनांक. १८ ऑगस्ट २०२४ ला चिमूर तहसिल कार्यालयावर भिक्षु ज्ञानज्योती महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन केले यामध्ये माना विद्यार्थी संघटना ,समता सैनिक दल ,तपोवन बुद्ध विहार , माना आदिम जमात ,बौद्ध पंचकमिटी चिमूर ,बिरसा मुंडा ब्रिगेड , भारतीय बौद्ध महासभा , बांधिलकी फाऊंडेशन व रामदेगी परिसर क्षेत्र अशा विविध संघटना यांनी पाठिंबा दर्शवित चिमूर येथे हा मोर्चा दुपारी ठिक १.०० वाजता संविधान चौक, येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन चिमूर येथे रॅली काढून भाजप सरकार विरोधी नारे देत याची सुरुवात करण्यात आली. इंदिरा नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून चिमूर तहसिल कार्यालयावर हा मोर्चा धडकला हा भव्य मोर्चा काढण्याचे उद्देश १ ऑगस्ट २०२४ ला मा. सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय न्यायाधिशांनी अनुसूचित जाती. अनुसूचित जमाती य...

भिसी शहर काँग्रेस कमिटी कार्यालयाचे उद्घाटन। विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती

इमेज
भिसी शहर काँग्रेस कमिटी कार्यालयाचे उद्घाटन।   विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती _______________________ ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर        7887325430 ---------------------------------- भिसी दि.१७: नागरीकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, व त्यांचे समस्यांचे निराकरणासाठी तसेच काँग्रेसचे संघटन मजबुतीसाठी भिसी शहरात काँग्रेस कमिटी कार्यालयाचे उ‌द्घाटन नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेवरावजी किरसान आणि चिमूर विधानसभा समन्वय सतिशभाऊ  वारजूकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय भाऊ वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थित होते.  याप्रसंगी माजी आमदार अविनाशभाऊ वारजूकर, ओबीसी नेते धनराज भाऊ मुंगले, काँग्रेस जिल्हा महासचिव सचिन भाऊ गाडिवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष गावंडे, भिसी काँग्रेस शहराध्यक्ष विजय मेहर, महिला काँग्रेस शहराध्यक्ष माधुरी रेवतकर, युवा काँग्रेस शहराध्यक्ष शुभम गिरडे तसेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भिसी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

शहिदांच्या स्मृती जपत,”विकसित भारत मजबूत भारत,हेच आमचे स्वप्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस — चिमूर क्रांती दिनानिमित्त शहिदांना अभिवादन!

इमेज
शहिदांच्या स्मृती जपत,”विकसित भारत मजबूत भारत,हेच आमचे स्वप्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  — चिमूर क्रांती दिनानिमित्त शहिदांना अभिवादन! ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर             7887325430 चिमूर ही शहिदांची भूमी आहे.देशाच्या इतिहासात चिमूर आणि आष्टीच्या क्रांतीची नोंद झाली आहे. स्वातंत्र्याच्या 5 वर्षाआधीच चिमूर मध्ये तिरंगा फडकला आणि चिमूर स्वतंत्र झाले.  तुकडोजी महाराजांच्या नेतृत्वात चिमूर मध्ये क्रांतीचे स्फुरण चढले,या स्वातंत्र्याचे मोल प्रत्येकाला कळले पाहिजे.भविष्यासाठी हा अनमोल ठेवा जतन करून ठेवत असतानाच “विकसित भारत आणि मजबूत भारत” हेच आमच्या सरकारचे ध्येय आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारची वाटचाल सुरू असून समाजाच्या प्रत्येक घटकामागे सरकार भक्कमपणे उभे आहे आणि भविष्यातही राहील,अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 16 ऑगस्ट चिमूर क्रांती दिनानिमित्त चिमूर येथे हुतात्मा स्मारक तसेच शहिदांना अभिवादन करताना ते बोलत होते.यावेळी मंचावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया,मितेश भांगडिया,माजी खासदार अशोक ...

पिडीत वैधकीय विद्यार्थिनीचा समर्थनार्थ इंडियन मेडिकल असोशियशंचे आंदोलन. - उपविभागीय अधिकारी मार्फत पंतप्रधान यांना दिले निवेदन

इमेज
पिडीत वैधकीय विद्यार्थिनीचा समर्थनार्थ इंडियन मेडिकल असोशियशंचे आंदोलन. - उपविभागीय अधिकारी मार्फत पंतप्रधान यांना दिले निवेदन  ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर              7887325430 चिमूर :- आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉक्टरांच्या संघटनेने दिले निवेदन.  ९ ऑगस्ट २०२४ ला आरजी कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे एका तरूण पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसीनच्या विद्यार्थीनीचा ड्युटीवर असतांना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली. या भिषण घटनेने वैद्यकिय समुदाय व  देशाला धक्का बसला आहे. याचाच निषेध व्यक्त करीत निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषध मोर्चे आयोजित केले आहेत. या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलीसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास अयशस्वी ठरले. आर जी कार महाविद्यालय प्रशासन व पोलीस यांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी, कोलकाता...

*आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा*

इमेज
*आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा* ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर दि. ९ ऑगस्ट/ *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांनी आज शेतकरी भवन चिमूर येथे आदिवासी विकास विभाग - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर द्वारा आयोजित जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम व गौरव सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. दरम्यान, आदिवासी विकास विभागाच्या वतीने *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांचा शाल व रोपटं भेट देऊन स्वागत-सत्कार करण्यात आला. याप्रसंगी *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांनी सर्वप्रथम सर्व थोर महात्म्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले आणि उपस्थितांशी विविध विषयांवर संवाद साधून जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांच्या हस्ते प्रकल्प कार्यालय एन. बी. योजनेअंतर्गत योजनांचे लाभार्थ्यांना धनादेश वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तालुक्यातील नव्याने शासकीय सेवेत नोकरीवर लागलेल्या यशवंत आदिवासी युवक/युवतींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोपटे प्रदान करीत त्यां...

९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस पार्टी तर्फे शहिदांना अभिवादन

इमेज
९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस पार्टी तर्फे शहिदांना अभिवादन ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर          7887325430 चिमूर : - दरवर्षी ९ ऑगस्ट क्रांती दिन हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. १९४२ साली महात्मा गांधी यांनी 'भारत छोडो आंदोलन' सुरू केले, ज्याला 'क्विट इंडिया मूवमेंट' असेही म्हटले जाते. या दिवशी भारतीय जनतेने इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारले आणि स्वातंत्र्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले. म्हणून संपूर्ण भारतात ९ ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनी दरवर्षीप्रमाणे यंदाही शहिदांना अभिवादन करण्याकरीता चिमूर तालूका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी तसेच युवा काँग्रेस च्या वतीने आज शुक्रवारला सकाळी ११ वाजता अभ्यंकर मैदान तसेच हुत्तामा स्मारक चिमूर येथे शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वक डॉ.सतिश वारजूकर , चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके, तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे, तालूका उपाध्यक्ष विवेक कापसे , काँग्रेस पार्टीच...

चिमूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करा- माजी जि.प.सदस्य गजानन बुटके

इमेज
चिमूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करा- माजी जि.प.सदस्य गजानन बुटके पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 70 हजाराची नुकसान भरपाई देण्यात यावी ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर             7887325430 चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात सतत मुसळधार पडल्याने सर्व नदी नाले तळे भरगोछ भरुन वाहू लागले असून सर्वत्र परीसर जलमय झाले आहे. अतिवृष्टीमुळे पावसाने फार मोठ्या प्रमाणावर शेतीची नुकसान झाले असून तालुक्यातील शेतकरी कर्ज घेऊन कर्जबाजारी झाले आता कसे फेडणार याची चिंता सतत शेतकऱ्यांना सतावत आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. याची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी 70 हजाराची नुकसान भरपाई देण्यात यावी व चिमूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा.  अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा कमिटीचे महासचिव गजानन बुटके यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधुन सविस्तर चर्चा केली. शेतकरी बांधवांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी प्रशासनास मागणी केली.

बापलेक बंधाऱ्यात वाहून गेले, झाडावर चढून बापाने वाचविला जीव मुलगा मात्र बेपत्ता

इमेज
बैलांना वाचवण्यासाठी गेलेले बापलेक गेले वाहून, मुलाचा बेपत्ता,तर वडील झाडावर चढून वाचले चिमूर: बैलांना बंधाऱ्याच्या पाण्यातून वाचविण्यासाठी दोघेही बापले गेले, परंतु दुर्दैवाने बंधाऱ्यात दोघेही वाहून गेले. मात्र वडिलांना झाडाचा आधार मिळाला आणि त्यांनी झाडावर चढून आपला जीव वाचविला परंतु बापाच्या डोळ्यादेखत मुलगा वाहून गेल्याने बापाच्या जिवंत असलेल्या हृदयात मृत्यूच दिसत होता. तालुक्यातील खडसंगी जवळ मजरा बेगडे गावातील रहिवासी वामन राणे, वय (४६) व मुलगा समीर राणे वय (२०) हे दोघे सकाळी शेताकडे गेले असता सायंकाळीं ४:३० वाजताच्या सुमारास बैलजोडी घेउन घराकडे येत असताना बंधाऱ्यावर बैल जात असल्याने दोन्ही बैलाचे दोर एकमेकाला गुंतले होते.त्यामुळें बंधाऱ्यावर गेलेल्या बैलाचे दोर सोडवण्यासाठी बापलेक बंधाऱ्यावर गेले. एक बैल बंधाऱ्यात शीरलेला होता व दुसरा बैल बाहेर होता. एकमेकाला बांधून असणारा दोर सोडवत असताना दुसऱ्या बैलाने ओढल्याणे दोघेही बापलेक बंधाऱ्या वरून खाली पडून वाहत गेले.   वामन राणे हे झाडाला अडकले व ते झाडावर चढले. त्यामुळें त्यांचा जिव वाचला. मुलगा समीर मात्र बंधाऱ्यात वाहून ग...

ब्रेकिंग न्यूज ...---चिमूर आगाराची बस झाली पलटी

इमेज
ब्रेकिंग न्यूज ...---चिमूर आगाराची बस झाली पलटी  ✍️शुभम गजभिये प्रतिनिधी पळसगांव  मो.9021083825 चिमूर : - चिमूर आगाराची बस चिमूर वरून दुपारी १२:३० वाजता नेरी वैजापूर मार्गे तळोधी ला जात होती हि बस सोनापूर येणोली माल च्या मधोमध दुपारी ०१:०० वाजताच्या सुमारास खराब रस्त्यामुळे MH 40 Y 5267 क्रमांकाची बस पलटी झाल्याने या बस मध्ये १० ते १२ प्रवासी प्रवास करीत होते. यामधील कुठलेही प्रवासी जखमी झाले नसून सर्वच प्रवासी सुखरूप असून त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे.

उमरीवासीयांना प्यावे लागते गढूळ पाणी आरोग्य धोक्यात, टँकरने पाणीपुरवठा

इमेज
उमरीवासीयांना प्यावे लागते गढूळ पाणी आरोग्य धोक्यात, टँकरने पाणीपुरवठा ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर             7887325430 चिमूर :- तालुक्यातील उमरी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा नळ योजनेतून परिसरात पाणी पुरवठा केला जातो. मात्र या योजनेचे पाणी मागील ३ दिवसांपासून गढूळ येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या ३-४ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पाणी स्वच्छ राहावे म्हणून ब्लिचिंग पावडरचा वापरही होत नाही. अशात सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. स्वतः डॉ. सतीश वारजुकर यांनी हातपंपाचे पाणी पिले असता ते पिण्या व वापरण्या योग्य नाही शुद्ध व पिण्यायोग्य पाणी लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी गावकऱ्यांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ. वारजुकर यांना करताच तत्काळ गावकऱ्यांसाठी टँकरने पाणी पाठवले गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष विनोद ढाकूनकर, तालुका उपाध्यक्ष र...

मोटेगाव येथील विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी आमदार बंटी भांगडिया यांचेकडून शैक्षणिक मदत

इमेज
मोटेगाव येथील विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी आमदार बंटी भांगडिया यांचेकडून शैक्षणिक मदत ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर           7887325430 चिमुर- तालुक्यातील मोटेगाव येथील शंकर पुरुषोत्तम पर्वते या विद्यार्थ्याला बी. फार्म द्वितीय वर्ष शिक्षणासाठी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे कडून आर्थिक मदत करण्यात येऊन पुढील शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक मदत करण्यात आली. या विद्यार्थ्याने आतापर्यंतच्या शैक्षणिक कालखंडात अप्रतिम कामगिरी करीत प्राविण्य प्राप्त केले होते परंतु पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक चणचण निर्माण झाल्याने पालकांनी त्याचा शिक्षण थांबविण्याचा विचार केला असता, त्याच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ही गंभीर बाब या क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ यांना सांगितली. सदर विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये व शिक्षण घेऊन तो स्वतःच्या पायावर उभा राहावे व कुटूंबाचे नाव उज्जवल करावे यासाठी आमदार साहेबानी तात्काळ शैक्षणिक मदत जाहीर करीत अर्थिक मदत, कार्यकर्त्यांच्या हस्ते त्याच्या वडिलांचे सुपुर्द करण्यात आली. यावेळी महामंत्री विलास कोराम, श. के. प्र. विक्की कोरे...

आमदार बंटी भाऊ भांगडीया यांनी वाघाच्या हल्ल्यातील जखमींना दिली तात्काळ मदत

इमेज
✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर 7887325430 चिमूर:- कवडू सावसाकडे, बालाजी नन्नावरे व बाबाराव दडमल यांच्या वर वाघाने हल्ला केल्या ने उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. तसेच नवेगाव पेठ येथील दामोदर नन्नावरे यांच्या वर वाघा ने हल्ला केल्या ने उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी औषधं उपचारासाठी दामोदर नन्नावरे यांच्या कुटुंबीयास आ. बंटीभाऊ भांगडिया यांनी त्यांच्या औषध उपचार साठी मदत दिली. आर्थिक मदत सुपूर्द करीत असताना राजु देवतळे, मनिष तुंम्पलीवार, बालू पिसे, प्रशांत चिडे कैलास धनोरे, कुणाल कावरे, रवी नन्नावरे, हरीश पिसे आदी उपस्थित होते. गरडापार येथील विद्यार्थीला उच्च शिक्षणासाठी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचेकडून शैक्षणिक मदत. चिमूर तालुक्यातील गरडापार येथील जितेंद्र श्रीकृष्ण नन्नावरे या विद्यार्थ्यांचे गव्हर्नमेंट पालिटेक्निक नागपूर येथे मेकॅनिकल इंजिनिअर करीता नंबर लागले असून घरच्या आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने फी भरू शकत नाही. व फी भरण्याची आजची शेवटची तारीख असल्याचे मा. आमदार बंटीभाऊ यांना कळताच हुशार होतकरू मुलाच्या भविष्य...

शेतकऱ्यांना जखमी करणाऱ्या वाघाचा बदोबस्त तात्काळ करा - साईश वारजूकर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रस सरचिटणीस

इमेज
शेतकऱ्यांना जखमी करणाऱ्या वाघाचा बदोबस्त तात्काळ करा - साईश वारजूकर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रस सरचिटणीस ✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर           7887325430 चिमूर : - दिनांक.०५/०८/२०२४ चिमूर तालुक्यात दिवसागणिक मानव व वन्यजीव संघर्ष वाढत चालला असून एकाच दिवशी तालुक्यातील विविध भागात पट्टेदार वाघाने ४ शेतकऱ्यांवर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक.०४/०८/२०२४ ला घडली यामध्ये गरडापार , किटाळी , उरकुडपार , नवेगाव पेठ येथील सर्व गंभीररित्या शेतकरी जखमी झाले असून या गावामध्ये नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रसचे महासचिव साईश सतिश वारजूकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय चिमूर येथे जखमी करणाऱ्या वाघाचे तत्काळ बदोबस्त करण्यात यावे याबाबतचे निवेदन देऊन गरडापार गावात जावून गस्तीवर असेलेले वनपरिक्षेत्र अधिकारी देऊरकर व नागरीक यांच्याशी सवांद साधला यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष रोशन ढोक , तालुका सरचिटणीस विलास मोहिनकर , युवक कॉग्रेसचे विधान सभा उपाध्यक्ष प्रशांत डवले , युवक काँग्रेसच...