Ticker

6/recent/ticker-posts

*समाजवादी गणराज्य पार्टी चिमूर तालुका अध्यक्षपदी रावन शेरकुरे यांची नियुक्ती*

*समाजवादी गणराज्य पार्टी चिमूर तालुका अध्यक्षपदी रावन शेरकुरे यांची नियुक्ती*


✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
         7887325430

चिमूर:- समाजवादी गणराज्य पार्टी अध्यक्ष कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात महासचिव अतुल देशमुख,प्रदेशाध्यक्ष अजित शिंदे यांनी समाजवादी गणराज्य पार्टीच्या चिमूर तालुका अध्यक्षपदी रावन शेरकुरे यांची नियुक्ती केली.रावन शेरकुरे यांना नियुक्तीचे पत्र सामाजिक कार्यकर्ते ऍड.भूपेश पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी आशिष वाघमारे,निलेश कोसे, नितीन पाटील,प्रल्हाद बोरकर,मनोज राऊत आदी उपस्थित होते.

शिक्षण,समता, प्रतिष्ठा,संधी आणि सत्ता प्रत्येकाच्या वाट्याला यावी यासाठी लोकशाही, धर्मनिरपेक्ष,समाजवादी आणि विज्ञानाभिमुख समाजरचनेसाठी समाजवादी गणराज्य पार्टी कार्यरत आहे.

रावन शेरकुरे यांची समाजवादी गणराज्य पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments