आपला विकास आणि गांव भकास!

आपला विकास आणि गांव भकास! शिवराम पाटील ९२७०९६३१२२ महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव बीज,खते,औषधी आणि माल विक्री यात शेतकरीची दैना होत आहे.शेतकऱ्यांची मुले सरकारी नोकरीत लागलीत कि,ते बापालाही सोडत नाहीत.तर इतरांची कशी कदर करणार? याला कारण आहे.मी अनेकदा विस्तृत लिहीले आहे कि, शेतकरी वर्गात, ग्रामीण भागात बुद्धी, ज्ञान,निती ची अलर्जी आहे.कोणी माणूस डॉक्टर वकील इंजिनिअर प्रोफेसर बनला तर त्याचा सत्कार होत नाही.पण पोलिस , फौजदार, तहसीलदार,बीडीओ बनला तर सत्कार करतात.का?याला आता शेतकऱ्यांना लुटण्याचा सरकारी परवाना मिळाला आहे.डॉक्टर, वकिल इंजिनिअर प्रोफेसर ला तसा परवाना मिळत नाही.त्याला बुद्धी ज्ञान वापरून व्यवसाय करावा लागतो. शिवाय गावात जो माणूस लुटमार करतो,दारू मटण खाऊ घालतो लोक त्याला नेता म्हणतात.सरपंच निवडून देतात.म्हणे जो लुटतो तोच खाऊ पिऊ घालतो.जो लुटत नाही,दारू दरफडा करीत नाही तो काय कामाचा?असा खुलासा देतात. घर, जमीन,खळे साठी भाऊ भाऊ, शेजारी शेजारी वाद घालून पोलिस स्टेशनमध्ये येतात.एकमेकांच्या शेतीवर अतिक्रमण करतात.या वेळेस गीता,भागवत, रामायण,...