Ticker

6/recent/ticker-posts

कृषी केंद्रातून जादा दराने कापूस बियाणे विक्री करताना रंगेहात पकडले


जळगाव - खरीप हंगामाची सुरुवात झालेली असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची पेरणी करण्यात येत आहे. यामध्ये राशी कापसाचे 659 या वाणाची मागणी होत आहे. मागणी जास्त असल्याचा फायदा घेत या बियाण्याचे पाकीट बाजारात बाराशे रुपयांच्या जादा दराने विकले जात आहे. आज (दि. 24) रोजी म्हसावद येथे जिल्हा भरारी पथकाने डमी ग्राहक पाठवून विक्रेत्याला ज्यादा दराने बियाण्याची विक्री करताना रंगेहाथ पकडत कारवाई केली आहे.

आज दि. 24 रोजी जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे 659 या वाणाची जादा दराने विक्री होत असल्याचे समजल्यावर तत्काळ सापळा रचण्याचे ठरवले. पथकाने डमी ग्राहक पाठवून 864/- रुपयाचे पाकीट 1200 रुपयाने विक्री करताना पकडले व विक्री केंद्र तपासणी, पंचनामा, विक्री बंद आदेश देण्यात आला व परवान्यावर कारवाई कामी परवाना अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.

या कारवाई दरम्यान जिल्हा भरारी पथकातील कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, मोहीम अधिकारी विजय पवार, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, धीरज बडे, कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक सदर सापळा पथकात सहभागी होते.

Post a Comment

0 Comments