पोस्ट्स

नांदगाव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नांदगाव येथे हनुमान जन्मोत्सव साजरा, भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

इमेज
मुल तालुका प्रतिनिधी      भीमरूपी महारुद्रा      वज्र हनुमान मारुती।      वनारी अंजनी सुता      रामदूता प्रभंजना।। https://youtu.be/upvYKn998Pw शक्ती आणि भक्तीचे प्रतिक असलेले श्रीराम भक्त हनुमान चा जन्मोत्सव आज उत्साहात आणि भक्ती भावाने साजरा होत आहे. मुल तालुक्यातील नांदगाव येथे बस स्थानक परिसरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भक्तगण महाप्रसादाचा आस्वाद घेत उत्साह साजरा करत होते. https://youtu.be/upvYKn998Pw

रानटी डुकराच्या हल्ल्यातून बचावलेल्या शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन पिकाची डुकरांनी केली नासाडी

इमेज
विजय जाधव मुल तालुका प्रतिनिधी                 ‌‌ विजय जाधव, मुल तालुका प्रतिनिधी. .                                     पोभूर्णा तालुक्यात अनेक गावात वाघाची दहशत असून ग्रामस्थ भयभयीत झाले आहेत. असे असताना रानटी डुकरांनीही उभ्या पिकांमध्ये हैदोस घातलेला आहे. वन विभागाला अर्ज, विनंती करूनही वन विभाग जंगलात ड्युटी असल्याचे कारणे दाखवून शेतकऱ्यांच्या अर्ज, विनंती व मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. रानटी डुकरांमुळे अनेक शेतकऱ्यांची नुकसान झाली असून मौजा नांदगाव येथे गेल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या रानटी डुकराच्या हल्ल्यातून बचावलेल्या नीलकंठ मारुती नरसपुरे वय ६० वर्ष या शेतकऱ्याची उन्हाळी सोयाबीन पीक गेल्या दोन दिवसापासून नास धूस करीत असल्याने नीलकंठ नरसपुरे यांची प्रचंड आर्थिक नुकसान झालेली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष शेतात जाऊन उन्हाळी सोयाबीन व तुरीच्या पिकाची प्रत्यक्ष पाहणे केली असता हे वास्तव समोर आले. याबाबतची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली असता त्यांनीही प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यापूर्वी पावसाळी सो...

घोसरी येथील स्मशानभूमीचे बांधकाम प्रलंबित! दफनविधीसाठी ग्रामस्थांना अंत्ययात्रा घेऊन जावे लागते लाल हेटीच्या स्मशानभूमीत

इमेज
विजय जाधव, नांदगाव: चंद्रपूर जिल्ह्यात शहरी भागात मोक्षधाम तर ग्रामीण भागात स्मशानभूमी शेड उभारण्यात आले आहेत. स्मशानभूमी साठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना थेट निधीची सुद्धा पूर्तता केली जाते. अनेक गावात स्मशानभूमी शेड उभारण्यात आले आहेत. परंतु पोंभुर्णा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या घोसरी या गावात ही योजना अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे. सन 2018 ते 19 या वर्षात गावात स्मशानभूमीच्या बांधकामासाठी जन सुविधा योजना अंतर्गत 4 लक्ष 88 हजार 660 रुपयांचा निधी मंजूर झाला. परंतु तत्कालीन ग्रामपंचायत कमिटीच्या उदासीनतेमुळे सन 2018 पासून स्मशान भूमी शेडचे बांधकाम अपूर्ण आहे. ग्रामपंचायतीला संपूर्ण निधी प्राप्त झाला. ग्रामपंचायत स्तरावरून कंत्राट दारा मार्फत सदर कामाला सुरुवातही करण्यात आली परंतु अजूनही काम पूर्ण झाले नाही. आणि वाजवीपेक्षा जास्त कामाची देखील कंत्राटदाराला अदा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. निधी प्राप्त होऊ नये काम पूर्णत्वास आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी स्मशानभूमी अभावी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. नाई...