पोस्ट्स

chandrapur लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शासकीय आश्रमशाळा मंगी (खुर्द) येथील शिक्षकावर पोस्को लावा.*. बिरसा क्रांती दल ची मागणी

इमेज
आदिवासी विकास विभागाच्या विकास कामांना गती देण्याचे काम हे आश्रम शाळेतील शिक्षक करतील ह्या आशेने ग्रामीण भागात आश्रम शाळा सुरू करण्यात आल्या. त्यातून सुरुवातीला अनेक विद्यार्थी घडून सामाजिक ,आर्थिक,व शैक्षणिक विकास करण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या काही काळात आदिवासी आश्रम शाळेतील मुलींवर अत्याचाराचे प्रकार वाढतांना दिसत आहे. त्या अनेक शिक्षकाचा तसेच कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याने त्यांनां शिक्षा पण झाली आहे .तरी ही अनेक शिक्षक अजूनही आपला प्रताप सुरूच ठेवले आहेत.          शासकीय आश्रम शाळा मंगी येथील शिक्षकाने शाळेतील मुलींवर वाईट नजर ठेवून त्यांनां अश्लिल शिवीगाळ करून जातीवाचक शिवी दिली.प्रकरणाची माहिती आदिवाशी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर येथे देऊनही त्या शिक्षकाला कुठलीही कारवाही न करता त्याची पाठराखण करीत आहे की काय असे चित्र दिसत आहे. शिक्षकावर पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आज बिरसा क्रांती दल राजुरा च्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व आदिवासी विकास मंत्री ह्यांना तहसीलदार, तहसील कार्यालय राजुरा ह्यांच्या मार्फत निवेदन पाठवून करण्यात आली.मागणी...

कै. नीलकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयात रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

इमेज
  वरोरा :- भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित कै. निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय वरोरा येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून श्री. रमेशराव राजूरकर उद्योगपती व समाजसेवक वरोरा हे उपस्थितीत होते. भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित कै. निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय वरोरा येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उद्योगपती व समाजसेवक रमेश राजूरकर वरोरा हे उपस्थित होते. रोजगार व स्वयंरोजगार कार्यरक्रमात मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी सरकारी सेवेच्या मागे न लागता आपण उद्योगपती होऊन इतरांना नोकरी देणारे व्हावे असे मार्गदर्शन केले. प्राचार्य पियुष लांडगे यांच्या हस्ते पाहूण्यांचा सत्कार करण्यात आला. पाहूण्यांचा परिचय व प्रास्ताविक डॉ. प्रशांत पाठक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी खोंडे हिने केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तृप्ती वाढई हिने केले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे संचालक डॉ. कार्तिक श...