नांदगाव शेत शिवारात पट्टेदार वाघाचा मृत्यू! वनविभाग जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया -वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी-शिवसेना उपतालुका प्रमुख जीवनदास गेडाम यांची मागणी

विजय जाधव:- वाघ शिवारावर फिरत असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यापासून सुरू असून अनेकदा वर्तमानपत्रातून व इतर माध्यमातून वृत्त प्रकाशित होऊन वन विभागाला जागृत करण्याचे काम केले मात्र, सदर वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाही. वनविभागाच्या लापरवाहीमुळेच सदर वाघाचा मृत्यू झाला त्यामुळे वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख जीवनदास गेडाम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केलेली आहे. अनेकदा वाघ फुटाणा, नांदगाव, जुनगाव देवाडा बुद्रुक, बोंडाळा, घोसरी शेत शिवारात व झुडपी जंगलात फिरत असल्याच्या चर्चा अनेकदा ऐकायला आल्या.परिणामी शेतकरी शेतावर जाण्यास घाबरत होते. हल्ली शेतकऱ्यांच्या शेत पिकाची आर्थिक नुकसान होत असल्याने रानटी डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक शेतकरी आपल्या शेतमालाचा बचाव करण्यासाठी, कोणी झटक्याची मशीन लावतात आणि काही लोक विद्युत प्रवाहाची जोडणी सुद्धा करतात असे या घटनेवरून दिसून आले. असे असले तरी शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे होऊन सुद्धा वनविभागाच्या निष्काळजी आणि निद्रिस्त कोणामुळे ...