Ticker

6/recent/ticker-posts

प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत तर्फे सुमेधा वनकर या वीज कर्मचाऱ्यांचा सत्कार



विजय जाधव, मूल तालुका प्रतिनिधी:-
________________________________
 प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदगाव ग्रामपंचायत तर्फे नुकताच विज वितरण कर्मचाऱ्याचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 या कार्यक्रमात नांदगाव साठी उत्कृष्ट सेवा देणारे वीज वितरण कंपनी सावलीचे वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत असलेले सुमेधा गजानन वनकर यांचा नांदगाव ग्रामपंचायत तर्फे शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार गावच्या सरपंच एडवोकेट कुमारी हिमानीताई वाकुडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यांच्या कार्यरत सेवेनुसार हा त्यांचा दुसरा सत्कार असून यापूर्वी इस्लामपूर जिल्हा सांगली येथे कार्यरत असताना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल सत्कार करण्यात आला होता.
प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत कर्मचारी शुभम लोणारे यांचा सुद्धा ग्रामपंचायत तर्फे यावेळी शाल व श्रीफळ देऊन चांगल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय दशरथ भाऊ वाकुडकर ग्रामपंचायत सरपंच हिमानिताई वाकुडकर, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांबोडे, ग्रामपंचायतचे उपसरपंच सागर देऊरकर, पोलीस पाटील प्रिन्सिपल देवताळे, माजी उपसरपंच विजय जाधव, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments