विजय जाधव:-चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चेक नवेगाव येथे थ्रेशर मशीन वर तुरी मळणीचे काम करत असताना थ्रेशर मशीन मध्ये उजवा हात गेल्याने तो मशीन मध्ये ओढल्या गेला. या दुर्दैवी घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. आज शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी नवेगाव मोरे येथील शेत शिवारात घडली. महेश अरुण लोहे वय वर्ष 22 असे मृत तरुणाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महेश लोहे हा नवेगाव मोरे येथील शांताराम कन्नाके यांच्या शेतात तुरी मळणीचे काम करण्याकरिता थ्रेशर मशीन वर गेला होता. तुरीची पेंडी मशीन मध्ये टाकता टाकता अचानक नकळत त्याचा उजवा हात मशीनमध्ये अडकल्याने तो थ्रेशर मशीन मध्ये ओढल्या गेला. त्यामुळे मशीन मध्ये दाबूनच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. व त्याचे शरीर मशीन मधून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळावर पीएसआय गंधेवार, अविनाश झाडे, त्यांची चमु उपस्थित आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading