पोस्ट्स

कोरपणा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बिबट्याच्या हल्ल्यात नववर्षीय बालक ठार

इमेज
कोरपणा:वन्यजीव आणि मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालले असून यात विदर्भातील अनेक लोकांचे बळी गेले आहेत. रोज कुठे ना कुठे वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. काल सायंकाळच्या सुमारास एका नववर्षीय बालकास बिबट्याने घटना घडली आहे. कोरपना तालुक्यातील बेलगाव जांभुळा शेत शिवारात आई-वडिलांसह शेतात काम करीत असताना अंदाजे सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास एका नववर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून जंगलात अर्धा किलोमीटर फरकळत नेले. सदर घटना 25 डिसेंबर रोजी घडली असून भूक लागली म्हणून तो डब्बा घेण्यासाठी धुर्यावर आला असता अचानकपणे बिबट्याने हल्ला केल्याचे कळते. बिबट्या मुलाला जंगलात फरकडत नेत असताना जवळच असलेल्या जनावरे चारत असलेल्या देवराव धुर्वे यांनी आरडाओरडा करून बिबट्याला पडून लावले. पण तोपर्यंत मुलांचा मृत्यू झाला होता. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. बातमी लिहि पर्यंत पुढील तपास सुरू होता.      या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने परिसरातील गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून मागील आठवड्या...

लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी संविधानाची मूल्ये आत्मसात करा- प्रा.माधव गुरनुले

इमेज
कोरपना / गडचांदूर  जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात आव्हाने देखील तेवढीच मोठी आहेत स्वातंत्र्यानंतर सात दशकामध्ये भारताने विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत अग्रेसर होत आहे मात्र भारतीय लोकशाही पुढील अनेक आव्हाने आजही कायम आहेत. खाजगीकरण, लोकसंख्या ,गरिबी स्वच्छता,भ्रष्टाचार ,धर्म,प्रांत,भाषा आणि लिंगाधारीत भेदाभेद यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात येत असून युवकांनी हे आव्हान पेलण्यासाठी संविधानांची मूल्ये आत्मसात केली पाहिजे असे प्रतिपादन खत्री महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख व ज्येष्ठ प्राध्यापक माधव गुरुनूले यांनी केले आहे. शरदराव पवार महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग, पोलिटिकल सायन्स क्लब व माजी विद्यार्थी समितीच्या वतीने आयोजित *भारतीय लोकशाही पुढील आव्हाने* या विषयावरील सेमिनार व वक्तृत्व स्पर्धेत ते बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजय कुमार सिंह तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून सरदार पटेल महाविद्यालयातील डॉ. निलेश चिमूरकर, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. हेमचंद दुधगवळी, डॉ. सुनील बिडवाईक व कार्यक्रमाचे आयोजक राज्यशास्त्र ...