ओरीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा 🔹कंत्राटी धोरण हद्दपार ५७ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा 🔹सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करित महाराष्ट्र शासन निर्णय घेण्यात अपयशी का❓ दिल्ली /चक्रधर मेश्राम

दिल्ली /चक्रधर मेश्राम दि. 03/10/2022:- ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक यांनी दिवाळीच्या सणानिमित्त आनंददायी मोठी घोषणा केली आहे. नवीन पटनाईक यांनी राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यां सदर्भात क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पटनाईक यांच्या या निर्णयानं राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन पटनाईक यांनी राज्यातील कंत्राटी भरतीचं धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित करुन घेतलं जाईल, अशी घोषणा पटनाईक यानी केली आहे. पटनाईक यांच्या या निर्णयाचं सर्वत्र मनसोक्त स्वागत होत आहे. नवीन पटनाईक यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट करित मोठी घोषणा केली आहे. आजचा दिवस माझ्यासाठी सर्वात आनंदाचा आहे. राज्यातील कंत्राटी भरती धोरण कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवसाची मी गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो. ओडिशातील कंत्राटी रोजगार धोरणाच्या युगाचा अंत झाला आहे. आपण सर्वजण मिळून लोकांची सेवा करुया, असं पटनाईक म्हणाले. ५७ हजार कर्मचारी नियमितपणे सेवेत काम करणा...