शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल पंधरा हजार रु. भाव द्या-सुदाम राठोड यांची मागणी

तालुका प्रतिनिधी कृष्णा चव्हाण जिवती- सुदामभाऊ राठोड यांच्या हस्ते तहसीलदार जिवती यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल 15000 (अक्षरी पंधरा हजार रुपये) भाव द्या. महागाईच्या काळामध्ये शेतकऱ्यांना बिजाई,खते आणि औषधे अत्यंत महाग दरामध्ये घ्यावे लागते.वरून वेळेवर निसर्ग साथ देत नाही, आणि सरकार सुद्धा शेतकऱ्यांची मदत करत नाही. कारण शेतकऱ्यांच्या मालाला व्यापारी किंमत ठरवतात. आणि शेतकऱ्यांचे सर्व माल व्यापारी आपल्या मर्जीने खरेदी करून शेतकऱ्यांचा माल साठा करतात.जेव्हा शेतकऱ्याजवळचा माल संपतो तेव्हा सरकार मालाला भाव वाढवतात ही वस्तुस्थिती आहे. सरकार फक्त व्यापाऱ्यांचा फायदा करतात. मग हा शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे की व्यापाऱ्यांच्या हा शेतकऱ्यांना भेडसावणारा प्रश्न आहे. तरी मुख्यमंत्री साहेबांनी जातीने लक्ष घालून या देशाच्या पोशिंद्याला न्याय मिळवून द्याल अशी विनंती जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी निवेदन देऊन केली आहे.यावेळी चंद्रपूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख विशाल राठोड,प्रल्हाद काळे, प्रदीप काळे,किशोर कांबळे, रामदास कांबळे गणपती येमे,भीमर...