जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी याआधी तिहेरी हत्याकांडाने हादरलेल्या मौशी गावात पुन्हा थरार

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी याआधी तिहेरी हत्याकांडाने हादरलेल्या मौशी गावात पुन्हा थरार दरारा 24 तास (चंद्रपूर): जादूटोण्याच्या संशयातून तालुक्यातील मौशी येथील एका वृद्धाच्या झालेल्या हत्येप्रकरणी नागभीड पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा तीन आरोपींना अटक केली. आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली. आसाराम सदाशिव दोनाडकर (वय ८० वर्षे) असे मृताचे तर संतोष जयघोष मैंद (२६), श्रीकांत जयघोष मैंद (२४) आणि रूपेश राजेश्वर देशमुख (३२) अशी आरोपींची नावे आहेत. गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आसाराम डोनाडकर आणि त्याचे कुटुंबीय पेरणीविषयी चर्चा करीत होते. अशातच तू जादूखोर आहेस, जादूटोणा करतोस, अशी आरडाओरड करीत दोनाडकर यांच्या घरावर काहीजण धावून आले. एकाएकी घरातून ओढत हाताबुक्क्यांनी मारहाण करीत घरातून रस्त्यावर आणले. आरोपींकडून मारहाण होत असताना आसाराम दोनाडकर हे डोक्याच्या भारावर रस्त्यावर पडले, यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. तरीही आरोपींची मृत आसाराम दोनाडकर शिवीगाळ सुरूच होती. आस...