पोस्ट्स

राजुरा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या! पोलीस प्रशासनात खळबळ

इमेज
पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या! पोलीस प्रशासनात खळबळ राजुरा: प्रतिनिधी दरारा 24 तास राजुरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल श्रीमंत कदम वय 32 वर्ष यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. पुढील कारवाही सुरू आहे. चौकशी अंतिम त्यांच्या आत्महत्येचे कारण समजणार आहे.

*राजुऱ्यात शिवगर्जना यात्रेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जोरदार शक्ती प्रदर्शन* *वज्रमूठ बांधून गद्दारांना धडा शिकवा:-माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे*

इमेज
संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवगर्जना यात्रा चालू आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, युवासेना विस्तारक शरद कोळी, युवासेना पूर्व विदर्भ हर्षल काकडे, सहसापर्क प्रमुख प्रकाश मारावार यांच्या मार्गदर्शनात ही सभा पार पडली. पक्ष फुटी नंतर राजुऱ्यात पहील्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र आलेले दिसले. या सर्व 40 गद्दारांना गाडून पुन्हा एकदा शिवसेना उभी करूया असा निर्धार शिवसेना नेते खैरे साहेबांनी बोलून दाखवला. पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम आणि जिह्वाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात आणि विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नियोजनात ही सभा यशस्वीरित्या पार पडली. याप्रसंगी महिला संघटिका उज्वलाताई नलगे , माजी संघटिका कुसुमताई उदार,माजी उपसंघटिका सरिताताई कुडे,तालुका प्रमुख वासुदेव चापले, तालुका प्रमुख सागर ठाकुरवार,समन्वयक प्रदीप येनूरकर, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, युवासेना तालुका प्रमुख अंकुश वांढरे,उपतालुका प्रमुख रमेश झाडे, रमेश पेटकर, सुधाकर मोरे,माजी संघटक नरसि...

बामनवाडा येथे शुल्लक कारणावरून महादेव कोडापे यांची भोकसून हत्या

इमेज
प्रतिनिधी: संतोष कुळमेथे राजुरा शहरालाच लागून असलेल्या गावात आज सकाळी पहाटे 9.30 वा शुल्लक वादातून महादेव कोडापे यांना  गावातील युवकाने सुरीने भोकसुन जखमी केले. त्यांना जिल्हा उपरुग्णालय येथे गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले. घाव गंभीर असल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले . चंद्रपूर येथे उपचारासाठी नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.       बामणवाडा येथे वादाच्या घटना नेहमी घडत असून त्याला कारण गावात मिळणारी अवैध दारू ,गावात जुगार व दारू बंद करावी अशी मागणी   नागरिकांकडून केली जात आहे. ह्याच मार्गाने अनेक अवैध धंदे सुरू असल्याने गावात पोलिस चौकी देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बोगस आदिवासींना संरक्षण देणाऱ्या सरकार च्या विरोधात राजुरात धरणे आंदोलन

इमेज
संतोष कुळमेथे राजुरा तालुका प्रतिनिधी        मूळ अनु जमातीच्या जागांवर नौकरीत असलेल्या बोगस आदिवासींना संरक्षण देऊन त्यांना सेवेत कायम ठेवण्याचा निर्णय 29 नोव्हेंबर 2022 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ह्यांनी घेऊन सर्वोच्च न्यायालयचा अवमान तसेच आदिवासी समाजावर अन्याय कारक निर्णय घेण्यात आला त्याचे आज चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा ह्या तालुक्यात पळसाद धरणे आंदोलनाच्यां रुपात बघायला मिळाले.शेकडो आदिवासी बांधव धरणे आंदोलनात सहभागी होऊन समर्थन करीत राज्य सरकार चा निषेध करण्यात आला.       राज्य सरकार हे नेहमी आदिवासी समाजाच्या विकासाच्या बाबतीत चुकीचे निर्णय घेण्यात अग्रेसर आहे असे दिसून येत आहे.मग तो निर्णय डीबीटी चां असो, अनू जमाती पी.हच.डी. फेलोशिप, पाच वर्षे खंड असलेल्या मुलांना शिष्यवृत्ती योजना बंद करण्याच्या निर्णय असो असे अनेक चुकीचे निर्णय घेण्याची भूमिका ह्या काही काळात घेण्यात आली. एकीकडे आदिवाशी समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्याचा विकास करण्याचा ढोंग करून दुसरी कडे समाजाच्या योजना बंद करून त्यांनां रोकले जात आहे असे मत बिरसा क्रांती दलाचे नेते संतोष कूळमेथे ह्यांनी बोलून दाखवले. ...

सामाजिक चळवळीत सत्याचा शोध घेणारे युवक निर्माण व्हावे... बापुराव मडावी

इमेज
....................................... संतोष कुळमेथे राजुरा तालुका प्रतिनिधी राजुरा - बहुजन, मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीला पुढे नेण्यासाठी आणि प्रस्थापित व्यवस्थेने समाजमनावर निर्माण केलेले गैरसमज, अंधश्रद्धा, वाईट प्रथांना मुठमाती देण्याकरिता महात्मा फुले यांच्या विचारावर चालणाऱ्या सामाजिक चळवळीत सत्याचा शोध घेणारे युवक निर्माण होण्याची आज समाजाला गरज आहे.ते कार्य तुलाना येथिल महात्मा फुले सार्व.वाचनालय चालविणारे युवक करीत असल्याने त्यांचा सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार गोंडवाना शिक्षण संस्थेचे सचिव तथा पाचगाव ग्राम पंचायत सदस्य बापुराव मडावी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी कार्यालयात तसेच तुलाना प्राथ.शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुधाकरजी हेपट यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना व्यक्त केले.        महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी व जि.प.शाळा तुलाना चे मुख्याध्यापक श्री.सुधाकरजी हेपट यांचा निरोप सत्कार समारंभ महात्मा फुले वाचनालय मंडळाच्या पुढाकाराने तुलाना ...
इमेज
राजुरा :- विधानसभा क्षेत्रात गोंडवाना गणतंत्र पार्टीने चांगली कामगिरी करत 20 ग्रामपंचायतीवर गोंडवाना गणतंत्र पार्टीने आपला झेंडा फडकवला आहे. जवळपास 20 ग्रामपंचायत निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टीने पहिल्यांदाच मोठी आघाडी घेतली आहे. राजुरा तालुक्यातील इसापूर - वरझडी, मानोली खुर्द, मांगी बू., अहेरी, सिर्सी बेरडी, भेंडाळा - नवेगाव, कावडगोंदी तर जिवती तालुक्यातील भारी, चिखली पाटण, आसापूर, खडकी रायपूर, माराई पाटण, धोंडाअर्जुनी, पुनागुडा (युती), येरमी येसापूर, राहपल्ली खुर्द (युती) सोरेकसा, कोरपना तालुक्यातील नांदा (युती), पिपर्डा आणि बेलगाव ग्रामपंचायतीवर गोंडवाना गणतंत्र पार्टीने झेंडा फडकवला. ही निवडणूक गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते गजानन पाटील जुमनाके, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, नगरसेविका तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सतलूबाई जुमनाके, माजी जिल्हाध्यक्ष बापूराव मडावी, जिल्हाउपाध्यक्ष माजी सभापती भीमराव मेश्राम, माजी जिल्हा परिषद सदस्य निशिकांत सोनकांबळे, प्रदेश प्रवक्ते महेबूब शेख जेष्ठ नेते तथा नगरसेवक ममताजी जाधव यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवण्...

मादगी समाज भवन व शासकीय वसतिगृह उभारण्यासाठी राजुरा तहसीलदारांना निवेदन

इमेज
मादगी समाज भवन व शासकीय वसतिगृह उभारण्यासाठी राजुरा तहसीलदारांना निवेदन   राजुरा :- मादगी समाज भवनासाठी उपरोक्त समाजाला जागा उपलब्ध करून दयावे मादगी समाज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही प्रगती व शिक्षणापासून वंचित आहे. राजुरा शहर व तालुक्यात शेकडोच्या संख्येने समाज राहत आहे. सर्वच समाजाचे समाज भवन मंदिर आहेत. मात्र मादगी, मोची व मादिगा हा समाज अशिक्षित व असंघटीत असल्यामुळे मुळ मानवी हक्कांपासून वंचित राहिला आहे. मादीगा समाज भवन तालुक्यात कुठेच नाही हे विशेष व मोची,मादिगा, मादगी,मादरू समाज महाराष्ट्र राज्य तालुका राजुराच्या वतीने राजुरा व मादगी समाज संविधान भवन व वस्तिगुह मादगी समाज जागे साठी मागील दहा-पंधरा वर्षापासुन नझुलच्या सर्वे न.१४९/२जागेवर अतिक्रमण केलेले आहे. राजुरा तालुक्यात समाजाची लोकसंख्या मोठी असताना सर्व शासकीय योजनांपासून  मादगी समाज वंचित राहिलेला आहे. तरी आपणांस विनंती आहे की, एक संविधानीक वास्तु समाजभवन उभारण्यात यावे मादगी समाजाला उपलब्ध व्हावे यासाठी महसुलची जागा उपलब्ध करून द्यावे या करिता राजुरा तालुक्यातील तहसीलदार हरीश गाडे साहेबाना निवेदन देण्यात आले.