संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवगर्जना यात्रा चालू आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, युवासेना विस्तारक शरद कोळी, युवासेना पूर्व विदर्भ हर्षल काकडे, सहसापर्क प्रमुख प्रकाश मारावार यांच्या मार्गदर्शनात ही सभा पार पडली. पक्ष फुटी नंतर राजुऱ्यात पहील्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र आलेले दिसले. या सर्व 40 गद्दारांना गाडून पुन्हा एकदा शिवसेना उभी करूया असा निर्धार शिवसेना नेते खैरे साहेबांनी बोलून दाखवला.
पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम आणि जिह्वाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात आणि विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नियोजनात ही सभा यशस्वीरित्या पार पडली.
याप्रसंगी महिला संघटिका उज्वलाताई नलगे , माजी संघटिका कुसुमताई उदार,माजी उपसंघटिका सरिताताई कुडे,तालुका प्रमुख वासुदेव चापले, तालुका प्रमुख सागर ठाकुरवार,समन्वयक प्रदीप येनूरकर, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, युवासेना तालुका प्रमुख अंकुश वांढरे,उपतालुका प्रमुख रमेश झाडे, रमेश पेटकर, सुधाकर मोरे,माजी संघटक नरसिंग मादर, उपजिल्हा प्रमुख युवासेना प्रणित अहिरकर, कुणाल कुडे,चिरंजीवी चिलका विरुर , विभाग प्रमुख बबलू कुशवाह, अमोल कोसुलकर, राजू लोणारे, अजय साकीनाला,संदीप घ्यार, गणेश चोथले,तालुका संघटिका ज्योतीताई नळे,सरपंच आशाताई उरकुडे संगीता विधाते, लता डखरे, मायाबाई मालेकर, निकिता झाडे,आणि समस्त आजी माजी शिवसेना,युवासेना,महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments