पोंभुर्णा प्रतिनिधी
दि.२७ फेब्रुवारी
शहरातील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. चालू,शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या विविध क्रीडा तसेच शालेय स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे विशेष अतिथी नगर पंचायतचे उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, नगर पंचायतचे विरोधी पक्षनेते आशिष कावटवार,नगरसेवक दर्शन गोरंटीवार, स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलचे संचालक संदीप ढोबळे,प्राचार्य संगिता देवगडे, रीझवान शेख, व आदी उपस्थित होते.
प्रत्येक वर्गातील प्रथम आलेल्या खेळात हस्ताक्षर,रांगोळी, स्मरणशक्ती, चित्रकला, शिल्पकला, वकृत्व यासारख्या बौद्धिक तर धावणे,लिंबू चमचा, बेडूक उडी,कराटे, कबड्डी,क्रिकेट यांसारख्या क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी प्रमुख अतिथीच्या हस्ते गौरवण्यात आले.
या संगणकाच्या युगात विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाकरिता मैदानी खेळ खेळणे आवश्यक असल्याचे मत शाळेचे संचालक प्रा.संदीप ढोबळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा पिदुरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पायल वनकर यांनी मानले .
0 Comments