दुःखद निधन: दिवाकर गंगाराम गेडाम यांचा अल्पशा आजाराने मृत्यू



चामोर्शी: गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका अंतर्गत येणाऱ्या लखमापूर बोरी येथील प्रसिद्ध डहाका वादक श्री.दिवाकर गंगाराम गेडाम यांचे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ६० वर्षे होते.
     परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे पोटाची खडगी भरण्यासाठी पत्नी आणि मुलगा मिरची तोडण्यासाठी तेलंगाना राज्यात गेले होते. सदर गृहस्थ हे एकटेच घरी राहत होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या प्रकृती बिघडली. यातच त्यांना आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी देवाज्ञा मिळाली. ही धक्कादायक बातमी त्यांच्या मुलगी, मुलाला व पत्नीला लागताच तेलंगानातून ते महाराष्ट्रासाठी रवाना झाले आहेत. अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे परिसरातील उत्कृष्ट डाहाका वादक हरपला अशी प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहे.
     त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा सुधीर,मुलगी शिला, बहीण, नातवंडे आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू