पोंभुर्णा: तालुक्यातील सातारा भोसले ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न लागताच चंद्रपूर जिल्हा परिषद व पोंभुरणा पंचायत समितीत एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख, विरोधी गटनेता आशिष कावटवार यांनी या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आमदार प्रतिभा धानोरकर, व अन्य आमदार महोदयांनी सदर बाब विधानसभेत लावून धरली. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा परिषदेत याचे पडसाद उमटले.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने पत्र काढून सदर प्रकरणी चौकशी करून मुदतपूर्व अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषद चंद्रपूरचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी ग्रामपंचायत यांनी याप्रकरणी दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पंचायत समिती व ग्रामपंचायत वर्तुळात कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे.
0 Comments