पोस्ट्स

यवतमाळ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

यवतमाळमध्ये ट्रक आणि इनोव्हाची जोरदार धडक,4 जागीच मृत्यू :गुरुद्वाराला दर्शनासाठी निघाले होते शीख कुटुंब, कारचा पूर्णपणे चुराडा

इमेज
यवतमाळमध्ये ट्रक आणि इनोव्हाची जोरदार धडक,4 जागीच मृत्यू :गुरुद्वाराला दर्शनासाठी निघाले होते शीख कुटुंब, कारचा पूर्णपणे चुराडा ब्युरो रिपोर्ट दरारा 24 तास यवतमाळ : अपघातांचे सत्र सुरूच आहे. यवतमाळ जिल्ह्यात इनोव्हा आणि ट्रकची धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी पहाटे यवतमाळ -नागपूर महामार्गावरील चापरडा गावाजवळ हा अपघात झाला आहे. - दरारा 24 तास न्युज नेटवर्क नांदेडला गुरुद्वाराला निघाले होते शीख कुटुंब मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब येथील शीख कुटूंब दर्शनाला नांदेड येथील गुरुद्वाराला दर्शनाला जात असताना हा अपघात झाला आहे. यवतमाळ-नागपूर महामार्गावर एका इनोव्हा गाडीतून हे शीख कुटुंब प्रवास करत होते. त्यांची इनोव्हा कार चारपडा गावाजवळ असताना गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार समोर असलेल्या ट्रकवर जोरात जाऊन आदळली. कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर दरम्यान, ही धडक इतकी जोरदार होती की, इनोव्हा कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. इनोव्ह...

जिवंत रुग्णाला केले मृत घोषित, चौकशी करण्याची मागणी

इमेज
यवतमाळ: वसंतराव शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला जिवंतपणी मृत असल्याचे घोषित करण्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता संबंधित रुग्ण हा ऑक्सिजन लावून उपचार घेत होता. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून रुग्ण नातेवाईकाने याप्रकरणी जिल्हाधिकारी अमोल हेगडे यांच्याकडे तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे. बाबुळगाव तालुक्यातील दिघी पुनर्वसन येथील देवेंद्र ज्ञानेश्वर कावणकर यांच्या वडिलांना 30 एप्रिलला आजारपणामुळे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. निमोनियाची लक्षणे व ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून वार्ड क्रमांक 19 मध्ये उपचारार्थ दाखल करून घेतले. कोरोणाचा स्थितीचा अहवाल प्रलंबित असल्यामुळे त्याच वार्डात उपचार सुरु होते. परंतु प्रकृती अस्वस्थ असल्याने डॉक्टरांनी कोरोणा चाचणी अहवाल येण्यापूर्वीच त्यांना वार्ड क्रमांक 25 मध्ये कोविडमध्ये दाखल करून घेतले. व तशी माहिती देखील कुटुंबियांना देण्यात आली. उप...