खुनाचा प्रयत्न करुन आरोपी फरार 👉 पोलीसांत ३०७ दाखल , नियोजित कट असल्याचा दाट संशय

👉 पोलीसांकडून श्र्वान पथकांच्या सहाय्याने तपास सुरू मात्र श्रीनगर हादरले ==================== गडचिरोली / प्रतिनिधी एका अनोळखी आरोपीकडून रात्री साकोली श्रीनगर येथील क्लिनीकमधे घुसून लॅब चालकावर जीवघेणा चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहरातील प्रभाग ०१ सेंदूरवाफा येथे ( ता. २६ ) च्या रात्री १० सुमारास घडली असून अनोळखी आरोपीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व पोलिसांनी श्र्वान पथकाला पाचारण करीत याचा कसून तपास सुरू केला आहे. २६ ऑक्टोबरला रात्री १० वा. श्रीनगर कॉलनी प्रभाग ०१ मध्ये गोबाडे हॉस्पिटलच्या समोर काव्या क्लिनीकल पॅथॉलाजी लॅबमध्ये एक २५ वर्षीय अनोळखी इसम गेला असता लॅब संचालक कन्हैयालाल निपाने ४२ यांना माझी रक्त तपासणी करून घ्या असे म्हणाला. निपाने यांनी त्याचे नाव विचारताच त्या अनोळखी आरोपीकडून लॅब संचालकावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. यावरच आरोपी थांबला नाही तर मानेला , हातावर व डोक्यावर चाकूने हल्ला केल्याने निपाने हे रक्ताच्या थारोळ्यात पडले व किंचाळले असता समोरच गोबाडे हॉस्पिटलच्या कम्पाउंडरने धाव घेत रूग्णवाहिकेला पाचारण करीत जखमीला उपजिल्हा...