*गावातील नागरिक कसा असावा.?*

*गावातील नागरिक कसा असावा.?* दरारा 24 तास न्युज नेटवर्क समद्या गावात नागरिकां मध्ये चर्चा असतात.सरपंच असा असावा, सरपंच तसा असावा!परंतु "गावात राहणारा नागरिक कसा असावा?"हे मात्र कुणीच बोलात नाही. बहूतांश गावात नागरिक रस्त्यावर गुरे ढोरे बांधतात,रस्त्यावर खतासाठी खड्डे करुन खत सुध्दा टाकतात, सरकारी सभागृहावर मालकी हक्क गाजवतात,रस्त्यावर इंधनकाडी ठेवतात,घरातील सांडपाणी जाणूनबुजून रस्त्यावर सोडतात,इतकेच नव्हेतर b& c च्या मुख्य रस्त्यावर बैलगाडी ठेवून त्याही पुढे अर्ध्या जास्त रस्तात वाहने, ट्रेक्टर,बैल बांधतात.रोडवर बैल बांधले असतात.त्यामुळे गाडी चालकाला तेथून गाडी काढण्यात खुप त्रास होतो. चुकून बैलाला थोडा जरी धक्का लागला, तर त्याचा बैल मालक अंगावर धावायचा ,ही एक मोठी गावकर्यासांठी शोकांतिका आहे.आपले गाव चांगले ठेवणे हे सरपंचाच्या हाती नसून ते आपल्या हाती आहे. कोणताही सरपंच करा ते तुम्हच्या घरा समोरील साफसफाई नाही करुन देणार.सरपंच धार्मिक स्थळासाठी निधी आणुन इमारत उभी करु शकतो, विकास निधी आणून गावचा विकास करू शकतो.परंतु त्या परिसरात गुरे, ढोरे, खते टाकून होणारी वाईट परिस्थ...