25 डिसेंबरला जूनगावात गहाण नाटकाचे आयोजन - नवनिर्वाचित आमदार देवराव दादा भोंगडे राहणार उपस्थित

25 डिसेंबरला जूनगावात गहाण नाटकाचे आयोजन - नवनिर्वाचित आमदार देवराव दादा भोंगडे राहणार उपस्थित पोंभुर्णा : प्रतिनिधी झाडीपट्टीतील सुपरहिट कॉमेडी, "हरिदास वैद्य" यांच्या लेखणीतून साकार झालेले तीन अंकी नाट्य पुष्प "गहाण" या नाटकाचा प्रयोग दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी जुनगाव येथे गोमाजी नागापुरे यांच्या भव्य आवारात आयोजित करण्यात आला आहे. या नाटकाला उद्घाटक म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार देवराव दादा भोंगडे हे राहणार असून त्यांच्या व्यतिरिक्त अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या नाटकाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन नाट्यकला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.