भू संपादन केलेल्या जमिनीचा मोबदला द्या भूपृष्ट परिवहन व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनातून पवनार येथील शेतकऱ्यांची मागणी

पवनार वार्ताहर :- पवनार-सेवाग्राम- हमदापुर-सेलडोह रोडचे गेल्या २०१७ पासून सहा वर्षांपासून काम सुरू असून शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करून पवनार-सेवाग्राम महामार्ग सिमेंट रोडचे 60% काम पूर्ण झाले परंतु, जिल्हा भूसंपादन अधिकारी वर्धा विभाग यांचे कडून अद्याप पर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यात आला नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यान कडून भूपृष्ठ परिवहन व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज दि. 26/12/20022 रोजी नागपूर येथे कृषी ऍग्रो व्हिजन सुरू असलेल्या नागपूर येथे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यानं कडून वारंवार जिल्हा भूसंपादन अधिकारी वर्धा विभाग यांना तक्रारी करत पैसे कधी मिळणार अशी माहिती घेतली असता ऑक्टोंबर महिन्यात मिळेल तर कधी नोहेंबर पर्यंत पैसे मिळतील अशी बतावणी करत बांधकाम विभाग वर्धा यांचे कडून दोन महिन्यांपासून अहवाल आले नसल्याने अवार्ड काढण्यात विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासकीय विभाग सहकार्य करण्यास विलंब करत आहे यात प्रामुख्याने बांधकाम विभाग यांचे कडून दोन महिन्यांपासून अहवाल येत नाही आहे. मग आम्ही करावे तरी काय अशी माहिती सांगण...