पवनार वार्ताहर :-
पवनार-सेवाग्राम- हमदापुर-सेलडोह रोडचे गेल्या २०१७ पासून सहा वर्षांपासून काम सुरू असून शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करून पवनार-सेवाग्राम महामार्ग सिमेंट रोडचे 60% काम पूर्ण झाले परंतु, जिल्हा भूसंपादन अधिकारी वर्धा विभाग यांचे कडून अद्याप पर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यात आला नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यान कडून भूपृष्ठ परिवहन व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज दि. 26/12/20022 रोजी नागपूर येथे कृषी ऍग्रो व्हिजन सुरू असलेल्या नागपूर येथे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यानं कडून वारंवार जिल्हा भूसंपादन अधिकारी वर्धा विभाग यांना तक्रारी करत पैसे कधी मिळणार अशी माहिती घेतली असता ऑक्टोंबर महिन्यात मिळेल तर कधी नोहेंबर पर्यंत पैसे मिळतील अशी बतावणी करत बांधकाम विभाग वर्धा यांचे कडून दोन महिन्यांपासून अहवाल आले नसल्याने अवार्ड काढण्यात विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासकीय विभाग सहकार्य करण्यास विलंब करत आहे यात प्रामुख्याने बांधकाम विभाग यांचे कडून दोन महिन्यांपासून अहवाल येत नाही आहे. मग आम्ही करावे तरी काय अशी माहिती सांगण्यात येत आहे त्या मुळे पैसे कधी मिळेल हे सांगणे कठीण आहे
गेल्या अनेक दिवसां पासून शेतकरयांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने संतप्त झालेल्या पवनार येथील शेतकऱ्यांनी नागपूर गाठत रोडचे गेल्या वर्षी पासून कासव गतीने काम सुरू असून ठीक ठिकाणी गड्डे पडले असून सहा महिन्यातच रोड ला तडे जाऊ लागले आहे यात कंत्राटदार यांचे कडून बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा ही आरोप या वेळी करण्यात आला असून वाहन धारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच अद्याप पर्यंत भू संपादन केलेल्या शेतकऱ्याना व लाभार्थी असलेल्या प्लॉट धारक तसेच इमारत धारकांना याचा मोबदला न देता रोडचे काम केले आहे त्या मुळे तत्काळ भू संपादन केलेल्या शेतकर्याना जमिनीचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनातून केली.यावर नितीन गडकरी यांनी बाजीराव हिवरे, गणेश हिवरे, रितेश निंबाळकर, रज्जत वैद्य, गणेश तिमांडे इत्यादी शेतकऱ्यांच्या शिष्टमडळा सोबत चर्चा करून,जिल्हा अधिकारी वर्धा यांना तत्काळ सूचना देवून शेतकऱ्याना तत्काळ मोबदला देण्यात यावा तसेच उर्वरित रोडचे बांधाकाम ताबडतोब करण्यात यावे अशा सूचना देण्याचे आश्वासन देण्यात आले, या वेळी बाजीराव हिवरे, गणेश हिवरे,रज्जत वैद्य,रितेश निंबाळकर,गणेश तिमांडे रवी झोरे,दिवाकर पेटकर,गजानन निंबाळकर,योगेश वैद्य,प्रेमनाथ हिवरे आदींची या वेळी प्रामुख्याने उपस्थित होती,
प्रतिक्रिया :- मागील एप्रिल महिन्यात या रोडचे काम सुरू झाले आहे त्यातच एक साईड काम पूर्ण न करता रोडच्या दोन्ही साईड उखरुंन ठेवण्यात आल्या या मुळे वाहन धारक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कंत्राटदार यांनी रोडची एक साईड पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या साईडचे काम सुरू करावे
रितेश निंबाळकर शेतकरी पवनार.
२०१७-१८ मधे या रोडला मंजुरी मिळाली असून या रोडला महामार्ग क्रं ३५३ आय असे नाव नमूद करण्यात आले पवनार सेवाग्राम रोडचे जवळपास ६०% काम पूर्ण झाले आहे तरी पण अजून पर्यंत शेतकर्याना मोबदला दिला गेला नाही जेव्हा की जमिनी अधिग्रहित करताच मोबदला देणे गरजेचे होते परंतु शासनाने असे न करता काम सुरू केले व अद्याप पर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला मोबदला दिला नसल्याने शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला देण्यात यावा
प्रेमनाथ हिवरे
पिडीत शेतकरी
काम सुरू होऊन अवघे सहाच महिने लोटले असून कामहि अपूर्णच आहे व त्यातच आतापासूनच रोडला तडे जाऊ लागल्याने सदर काम अतिशय निरुष्ट दर्जाचे होत असल्याचं दिसून येतं आहे परिणामी लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी यांनी चोकशी करून कामाचा दर्ज्या सुधारित करण्यात यावा व तसे न झाल्यास कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल करावे
रविंद्र झोरे
शेतकरी पवनार.
0 Comments