पोस्ट्स

मुल तालुका प्रतिनिधी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

चौथ्या दिवशीही वाघाची दहशत कायम:वाघाला बंदोबस्त करण्यास वन विभागाला अपयश

इमेज
विजय जाधव मूल तालुका प्रतिनिधी                मुल तालुक्यातील नांदगाव शेत शिवारात वाघ मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी नांदगाव शेत शिवारातील चोपण भागात वाघ निघाला. अशी चर्चा सुरू असतानाच काल गोवर्धन येथील बंडू दाऊजी शिंदे यांच्या शेतात वाघ दिसून आला. यामुळे शेतात काम करणारे मजूर वर्ग घरी निघून आले.वन विभागाला माहिती दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी रात्र गस्त घातली. परंतु वाघाला पकडण्यात अपयश आले.        पुन्हा आज दुपारी साडेबारा ते एक वाजे च्या दरम्यान नांदगाव शेत शिवारातील फुटाणा मार्गावरून कसर बोडी च्या दिशेने वाघ दिसून आल्याचे अनेकांनी बघीतले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन वाघाची शोधाशोध केली परंतु आजही वाघाला पकडण्यात वन विभागाला यश आल्याचे दिसून येत नाही.         या चार दिवसातील घटनांमुळे व वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी आपल्या शेतात जाण्यास घाबरत असून रब्बी पिकांची अतोनात नुकसान रानटी डुकरांच्या हैदोषामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. वाघाला त्वरित जेर बंद करून शेतकऱ्...

गोवर्धन शेतशिवारात आजही वाघाचा मुक्त संचार: वाघाच्या दर्शनासाठी बघ्यांची अलोट गर्दी

इमेज
                         ‌‌ विजय जाधव: मूल तालुक्यातील गोवर्धन शेतशिवारात वाघदर्शनाची आज दिनांक 8 फेब्रुवारी 2023 ला तिसरी घटना घडली असून सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास बंडु दाऊजी शिंदे यांच्या शेतात पट्टेदार वाघ शेतात काम करून परतीच्या मार्गावर असलेल्या शेतकऱ्यांना दिसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाला भ्रमणध्वनी द्वारे वाघ असल्याची माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन वाघाला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावल्याची नुकतीच माहिती प्राप्त झाली आहे.        यावेळी वाघाला बघण्यासाठी अलोट गर्दी उसळल्याचे प्राप्त माहितीनुसार कळते. वन विभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेली आहे.      शेतकरी भयभीत झालेला आहे. वाघाचा बंदोबस्त न केल्यास शेतकरी आपल्या शेतात जाऊन कामे कशी करणार? हा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

चॅम्पियन क्रिकेट क्लब फुटाणा च्या वतीने भव्य टेनिस बॉल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

इमेज
 ‌ विजय जाधव,मूल तालुका प्रतिनिधी:पोभुर्णा तालुक्यातील फुटाणा येथे चॅम्पियन क्रिकेट क्लब च्या वतीने माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार चषक स्पर्धेला दि.८/०२/२०२३ पासून सुरुवात होत असून फक्त ग्रामीण भागाकरिता एक गाव एक टीम व प्रथम दिवशीच सांस्कृतिक स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे.       या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून राज्याचे वने सांस्कृतिक मत्स्यपालन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माना सुधीर भाऊ मुनगंटीवार हे उपस्थित राहणार असून सह उद्घाटक जि प चे माजी अध्यक्ष देवराव दादा भोंगळे हे राहणार आहेत.तसेच अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा पंचायत समितीच्या माजी सभापती अलकाताई आत्राम यांची उपस्थिती राहणार आहे. सह अध्यक्ष माजी उपसभापती विनोद भाऊ देशमुख, हरीश भाऊ ढवस, दीपप्रज्वलन अजय भाऊ मस्के,निलेश भाऊ चिंचोलकर, उपसरपंच ग्रामपंचायत फुटाणा राहुल भाऊ पाल, उपसरपंच ग्रामपंचायत जुनगाव,अमोल भाऊ तालुका सचिव भाजपा, रंगमंच पूजक म्हणून गावच्या सरपंच सौ. संगीता ताई तेलसे तुळशीराम अर्जुनकर, माजी सरपंच चेक फुटाणा, गंगाधर मडावी माजी पंचायत समिती सदस्य, उपसरपंच नवेगाव...

नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने चौका चौकात नारळाचे वृक्षारोपण

इमेज
मुल तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने गावातील चौका चौकात नारळाचे वृक्ष लावण्यात आले सदर प्रसंगी वृक्षारोपण करताना सरपंच हिमानीताई वाकुडकर यावेळी उपस्थित होत्या.नांदगाव चे माजी उपसरपंच विजय जाधव, तसेच माजी उपसरपंच जोगेश्वर मोरे, सारंग भंडारे, बंडूजी चलाख,किसनजी अलीवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  गावातील चौका चौकात नारळाची झाडे लावण्यात येत असल्याने ग्रामपंचायतच्या अभिनव उपक्रमाबद्दल नागरिकांनी प्रशंशा केलेली आहे.असेच चांगले कार्यक्रम होत राहावे अशी अपेक्षा सुद्धा केलेली आहे.

बेंबाळ येथे अग्नी तांडव, घर जळून लाखोचे नुकसान

इमेज
विजय जाधव:मूल प्रतिनिधी मूल तालुक्यातील बेंबाळ येथील अमोल मुरलीधर पगडपल्लिवार यांचे शॉर्टसर्किट मुळे घर जळाल्याची घटना आज बारा वाजताच्या दरम्यान घडली. वायरिंग शॉर्ट झाल्यामुळे ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले. या घटनेत पगडपल्लिवार यांचे घरी असलेले टीव्ही, कुलर, बेड, कपाट, पैसे, कपडे, सोना संपूर्ण संपूर्ण घरगुती साहित्य जळून खाक झाले. घर मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अंदाजे चार लाखापर्यंतचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच घराशेजारी आणि गावातील नागरीकानी गर्दी केली आणि आग विझविण्यात यश आले. माञ तोपर्यंत अमोल मुरलीधर पगडपल्लिवार यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे पगडपल्लिवार यांनी गटातून काही पैसे घेतले होते, ते ही या आगीत जळून खाक झाल्याची माहिती आहे.