विजय जाधव: मूल तालुक्यातील गोवर्धन शेतशिवारात वाघदर्शनाची आज दिनांक 8 फेब्रुवारी 2023 ला तिसरी घटना घडली असून सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास बंडु दाऊजी शिंदे यांच्या शेतात पट्टेदार वाघ शेतात काम करून परतीच्या मार्गावर असलेल्या शेतकऱ्यांना दिसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाला भ्रमणध्वनी द्वारे वाघ असल्याची माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन वाघाला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावल्याची नुकतीच माहिती प्राप्त झाली आहे.
यावेळी वाघाला बघण्यासाठी अलोट गर्दी उसळल्याचे प्राप्त माहितीनुसार कळते. वन विभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेली आहे.
शेतकरी भयभीत झालेला आहे. वाघाचा बंदोबस्त न केल्यास शेतकरी आपल्या शेतात जाऊन कामे कशी करणार? हा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
0 Comments