Ticker

6/recent/ticker-posts

*महिला आघाडी घराघरात पोहोचवा : सुषमाताई साबळे* 🚩 चंद्रपूर येथे शिवसेना महिला आघाडीची आढावा बैठक

*महिला आघाडी घराघरात पोहोचवा : सुषमाताई साबळे* 🚩
चंद्रपूर येथे शिवसेना महिला आघाडीची आढावा बैठक 

चंद्रपूर : पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य व शिवसेना महिला आघाडी जिल्ह्यातील प्रत्येक घरात पोहोचवा, असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख सुषमाताई साबळे यांनी केले.
 
चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा विधानसभा क्षेत्रातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीची आढावा बैठक ७ फेब्रुवारी रोजी विश्रामगृह, चंद्रपूर येथे पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. 

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हा संघटीका उज्वला प्रमोद नलगे यांनी सुषमा साबळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सुषमा साबळे यांनी तीनही विधानसभेचा आढावा घेतला. तीनही विधानसभा क्षेत्रातील काही महिला आघाडीच्या नियुक्त्या केल्या. त्यांना नियुक्तीपत्र दिले. 

साबळे पुढे म्हणाल्या, जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी महिला आघाडीच्या शाखा सुरू करण्यात आल्या आहे. यामाध्यमातून पक्षाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटन आणखी कसे मजबूत करता येईल, यावर येत्या काळात महिला आघाडीने काम करावे. 

यावेळी जिल्हा संघटीका उज्वला प्रमोद नलगे, उपजिल्हा संघटीका विद्या ठाकरे, शहर संघटीका वर्षा कोठेकर, उपशहर संघटीका किरण जुनघरे व चंद्रपूर, बल्लारपूर व राजुरा विधानसभा क्षेत्रातील महिला आघाडीच्य पदाधिकारी, सदस्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments