विजय जाधव,मूल तालुका प्रतिनिधी:पोभुर्णा तालुक्यातील फुटाणा येथे चॅम्पियन क्रिकेट क्लब च्या वतीने माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार चषक स्पर्धेला दि.८/०२/२०२३ पासून सुरुवात होत असून फक्त ग्रामीण भागाकरिता एक गाव एक टीम व प्रथम दिवशीच सांस्कृतिक स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून राज्याचे वने सांस्कृतिक मत्स्यपालन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माना सुधीर भाऊ मुनगंटीवार हे उपस्थित राहणार असून सह उद्घाटक जि प चे माजी अध्यक्ष देवराव दादा भोंगळे हे राहणार आहेत.तसेच अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा पंचायत समितीच्या माजी सभापती अलकाताई आत्राम यांची उपस्थिती राहणार आहे. सह अध्यक्ष माजी उपसभापती विनोद भाऊ देशमुख, हरीश भाऊ ढवस, दीपप्रज्वलन अजय भाऊ मस्के,निलेश भाऊ चिंचोलकर, उपसरपंच ग्रामपंचायत फुटाणा राहुल भाऊ पाल, उपसरपंच ग्रामपंचायत जुनगाव,अमोल भाऊ तालुका सचिव भाजपा, रंगमंच पूजक म्हणून गावच्या सरपंच सौ. संगीता ताई तेलसे तुळशीराम अर्जुनकर, माजी सरपंच चेक फुटाणा, गंगाधर मडावी माजी पंचायत समिती सदस्य, उपसरपंच नवेगाव भुजला यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
या स्पर्धेचा खेळाडूंनी, क्रीडा प्रेमींनी तसेच परिसरातील नागरिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन चॅम्पियन क्रिकेट क्लब फुटाण्याचे अध्यक्ष माननीय खुशाल पाल यांनी केलेले आहे.
0 Comments