विजय जाधव-मुल तालुका प्रतिनिधी
मुल तालुक्यात येत असलेल्या नांदगाव गोवर्धन शेतशिवारात व खेेडी- गोंडपिपरी या मुख्य रस्त्याच्या अगदी जवळच आज दिनांक ७ फेब्रुवारी रोजी वाघाचे दर्शन सदर पट्टीदार वाघ हा दिघोरीच्या वाटेने निघून गेला असल्याचे प्रत्यक्षदर्शी नीी सांगितलेे. घटना दुपारी दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान घडली.संबंधित बाब वन विभागाला कळविण्यासाठी नागरिकांनी फोन द्वारे फोन केला असता कुठल्याही वनाधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
मागील दोन महिन्यापासून या परिसरात तीन वाघांचे वास्तव्य असल्याच्या बातम्या नागरिकांनी माध्यमान पुढे सांगितल्या त्यानुसार माध्यमांनी वेळोवेळी त्या बातम्यांना प्रसिद्धी दिली. मात्र वनविभागाला कुठलीच जाग आलेली दिसत नाही. त्याचाच परिणाम असा झाला की काल दिनांक 6 फेब्रुवारी रोजी नांदगाव शेत शिवारात पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळून आला.
0 Comments