विजय जाधव:- वाघ शिवारावर फिरत असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यापासून सुरू असून अनेकदा वर्तमानपत्रातून व इतर माध्यमातून वृत्त प्रकाशित होऊन वन विभागाला जागृत करण्याचे काम केले मात्र, सदर वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाही. वनविभागाच्या लापरवाहीमुळेच सदर वाघाचा मृत्यू झाला त्यामुळे वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख जीवनदास गेडाम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केलेली आहे.
अनेकदा वाघ फुटाणा, नांदगाव, जुनगाव देवाडा बुद्रुक, बोंडाळा, घोसरी शेत शिवारात व झुडपी जंगलात फिरत असल्याच्या चर्चा अनेकदा ऐकायला आल्या.परिणामी शेतकरी शेतावर जाण्यास घाबरत होते. हल्ली शेतकऱ्यांच्या शेत पिकाची आर्थिक नुकसान होत असल्याने रानटी डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक शेतकरी आपल्या शेतमालाचा बचाव करण्यासाठी, कोणी झटक्याची मशीन लावतात आणि काही लोक विद्युत प्रवाहाची जोडणी सुद्धा करतात असे या घटनेवरून दिसून आले. असे असले तरी शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे होऊन सुद्धा वनविभागाच्या निष्काळजी आणि निद्रिस्त कोणामुळे अनेक प्रकरण प्रलंबित आहेत. कोणालाही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे शेतकरी सांगतात. आपल्या शेत पिकाची नुकसान होऊ नये यासाठी झटका मशीनद्वारे शेतकरी शेत पिकाचे रक्षण करतात. मात्र या घटनेत रानटी डुकरांच्या बंदोबस्तासाठी लावण्यात आलेला वीज प्रवाह चक्क पटेदार वाघाच्या जीवावर उलटला. वाघ या घटनेत जागीच ठार होऊन गतप्राण झाला. ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वीची असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कारण वाघाच्या शरीरातून दुर्गंधी येतो होती आणि तो खूप मोठा फुगलेला होता. यावरून ही घटना दोन दिवसांपूर्वीची असावी असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना ही घटना आज माहीत झाली. माहिती वन विभागाकडे कोणी दिली यासाठी क्षेत्र सहाय्यक बोधे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठांना विचारण्याचे सांगितले. वरिष्ठ अधिकारी अर्थात वनपरिक्षेत्राधिकारी फनिंद्र गादेवार यांच्याशी संपर्क साधून घटने विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.
श्री अरुण मशालकर यांच्या मालकीची नांदगाव शेतशिवारात शेती असून नांदगाव येथील शेतकरी पुनाजी मारुती नाहगमकर हे त्यांची शेती भाडेतत्त्वावर करतात. शेतात त्यांनी हरभरा पिकाची लागवड केलेली आहे. आपल्या पिकाची राखण करण्यासाठी व पिकाचा बचाव करण्यासाठी त्यांनी तारेचे कंपाउंड करून रानटी डुकरांपासून पीक वाचवण्यासाठी विद्युत प्रवाहाची जोडणी केली.
परंतु विद्युत तारांना पटेदार वाघाचा स्पर्श झाल्याने वाघाचा मृत्यू झाल्याची कबुली पुनाजी नाहगमकर यांनी वन विभागासमोर दिल्याची माहिती आहे.
भविष्यात अशाच प्रकारे घटना घडणार असून वन विभागाने याबाबतची तात्काळ दखल घेऊन असे प्रकार घडू नये याची खबरदारी घ्यावी, अन्यथा भविष्यात आपल्या शेत पिकांची वन्य प्राण्यांपासून होणारी नुकसान टाळण्यासाठी शेतकरी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात अशा प्रतिक्रिया शेतकरी वर्गात उमटत आहेत. मृत वाघाला
उत्तरीय तपासणीसाठी वाघाला रवाना करण्यात आले. यावेळी मध्य चंदा वनविभागाचे वनसंरक्षक, वनपरिक्षेत्राधिकारी फनींद्र गादेवार, अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस विभाग आणि विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी हजर होते. मृत वाघ मादी आहे की नर याबाबतची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी गादेवार यांचे कडून प्राप्त झाली नाही.
0 Comments