पोस्ट्स

नांदगाव/मुल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करा-माजी जि प अध्यक्ष विनोद अहिरकर

इमेज
लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करा-माजी जि प अध्यक्ष विनोद अहिरकर विजय जाधव प्रतिनिधी, नांदगाव: येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यास लोखंडी रॉडने मारहाण केल्याची समताप जनक घटना घडली. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहीरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. नांदगाव येथे जिल्हा परिषद हायस्कूल आहे. या शाळेतील सहायक शिक्षक मनोज आगलावे यांनी बुधवार (ता. १८) दुपारच्या सुटीत सातवीच्या वर्गात प्रवेश केला. वास्तविक वर्ग सात मध्ये आगलावे यांचा कसलाही रोल नाही. तरी सुद्धा त्यांनी वर्गात जाऊन लोखंडी रॉडने वर्गातील मुलांना मारहाण केली. त्यात सुमित दिलीप शिंदे या विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागला. मंजित रोशन भंडारे या विद्यार्थ्यालाही इजा झाली. मनोज आगलावे यांनी यापूर्वी शाळेतील नयन नायगमकार यालाही मारहाण केली होती. याप्रकरणात मुख्याध्यापकांनी आगलावे यांच्यावर कारवाई केली होती. मा...